Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री (South Actress) निधी अग्रवालचा (Nidhi Agarwal) चाहत्यांच्या गर्दीच्या गराड्यात अडकल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल (Video Viral) झालेला. अगदी तसंच काहीसं साऊथची सुपरस्टार अभिनेत्री (South Superstar Actress) समंथा रूथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) झालंय. समंथा एका इव्हेंटसाठी हैदराबादमधील (Hyderabad) एका स्टोअरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झालेली. इथून परतताना समंथाला चाहत्यांनी गराडा घातला. त्यातून वाट काढत समंथा कशीबशी गाडीपर्यंत पोहोचली. कुणी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आरडाओरडा केला, तर कुणी तिच्या साडीचा पदर ओढला. चाहत्यांचा उतावळेपणा पाहून खरंच पायाखालची जमिन हादरते. व्हिडीओ पाहून हे नक्की चाहते आहेत की, जंगली श्वापदं हाच प्रश्न पडतो.
काही दिवसांपूर्वी निधी अग्रवालसोबत गर्दीनं काय केलं? हे सर्वांनी पाहिलं. निधीसोबतची घटना हैदराबादमधील लूलू मॉलमध्ये घडलेली. आता त्याच हैदराबादमध्ये समंथा रूथ प्रभूसोबतही चाहत्यांनी नको ते कृत्य केलं आहे. समंथानं हैदराबादमधील एका लॉन्च कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली. कार्यक्रमातील अभिनेत्रीचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावेळी अभिनेत्री कार्यक्रम सोडून तिच्या गाडीत जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेली चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. एका व्हिडीओमध्ये, समंथा प्रभू गर्दीनं वेढलेली दिसली. त्यावेळी तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडालेली.
गर्दीनं ओढला समंथाचा पदर
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, समंथा त्या इव्हेंटसाठी आल्यानंतर तिथे खूप मोठी गर्दी जमा झालेली. त्यावेळी गर्दीतून कुणी तिला ढकललं, तर कुणी साडीचा पदर ओढला. अशातच त्या गर्दीत अनेकजण खाली पडतात. एवढी गर्दी असूनही समंथा अगदी शांतपणे गर्दीतून रस्ता काढत गाडीपर्यंत पोहोचली. या व्हायरल व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं लिहिलंय की, "हे चाहते इतके विचित्र का आहेत?" दुसऱ्यानं विचारलं की, "ते श्वापदांसारखे का वागत आहेत?" तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, "या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे?"
समंथा सिल्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती...
कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी समंथानं इंस्टाग्रामवर तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री काळ्या सिल्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिनं साडी स्लीव्हलेस ब्लाउजसह वेअर केलेली. हेव्ही गोल्डन इयरिंग्स घातलेले आणि कपाळावर काळी टिकली लावलेली. या लूकमध्ये समंथा खूपच सुंदर दिसत होती.
गर्दीच अडकलेली निधी अग्रवाल
काही दिवसांपूर्वी प्रभासचा अपकमिंग सिनेमा 'द राजा साब'चं गाणं 'सहाना सहाना'च्या लॉन्च इव्हेंटमध्ये निधी अग्रवालसुद्धा गर्दीत अडकलेली. गर्दीनं अभिनेत्री पुरती बेहाल झालेली. ज्यानंतर या प्रकरणी कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात आलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :