Horoscope Today 22 December 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 22 डिसेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

कष्ट खूप करावे लागल्यामुळे थोडा मानसिक त्रास करून घ्याल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आरोग्याच्या दृष्टीने प्रकृतीला जपायला हवे, रिंगाळणाऱ्या व्याधींवर उपचार करावे लागतील.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज नको त्यांचे पाय धरावे लागतील कोणतेही धाडस करताना दहा वेळा विचार करा.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

महिलांचा तापटपणा वाढेल तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी अचूक पार पाडाल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

तुमच्या स्वभावामुळे तरुण वर्ग त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्याकडे बोलतील थोडे संवेदनशील बनाल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

शिल्लक गोष्टींनी निराश व्हायचे नाही हे ठरवून टाका लोकांना सहकार्य करण्यात अग्रेसर राहाल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल गायन वादन कलेत उत्तम प्रगती दर्शवते.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

चांगल्या गोष्टींची खरेदी करून तुमची सौंदर्य अभिरुची दाखवून द्याल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आर्थिक स्थिती मनासारखी राहील महिला समतोलपणा राखतील.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

एखाद्या भांडखोर व्यक्तीला तुमच्यावर सोपवले तर त्याला तुम्ही बरोबर सरळ कराल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

अडलेली सरकारी कामे मार्गी लागतील नोकरी व्यवसायात पूर्वी न मिळालेल्या संधी मिळतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आज नेटाने कामाला लागाल नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक गोष्टींचा अंदाज जरूर घ्या.

हे ही वाचा :                                                                      

Weekly Lucky Zodiac Signs : डिसेंबरचा शेवटच्या आठवड्यात 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार; शुभ योगांसह संपत्तीत होणार भरभराट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य