Nidhhi Agerwal Gets Mobbed At Raja Saab Song Launch Event: प्रभास (Prabhas) स्टारर 'द राजा साब' (The Raja Saab) हा सिनेमा त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. बुधवारी (17 डिसेंबर) निर्मात्यांनी हैदराबादमध्ये (Hyderabad) चित्रपटाचं 'सहाना सहाना' गाणं (Sahana Sahana Song Launch) लाँच करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, अभिनेत्री निधी अग्रवाल (Actress Nidhi Agarwal) इव्हेंटमधून बाहेर पडत असताना गर्दीनं तिला घेरलं. कुणी तिला खेचलं, तर कुणी तिला ढकललं... अक्षरशः जंगली श्वापदांसारखे चाहते तिच्यावर तुटून पडले. त्यातून कसाबसा रस्ता काढून निधी गाडीपर्यंत पोहोचली, तिला अक्षरशः गाडीत कोंबलं. त्यावेळी इव्हेंटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी हैदराबादमधील लुलू मॉलमध्ये (LuLu Mall) गाण्याचा लाँच इव्हेंट पार पडला. दिग्दर्शक मारुती आणि मुख्य अभिनेत्री निधी अग्रवाल देखील कार्यक्रमाला उपस्थित होती आणि तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमलेली.
प्रभास स्टारर 'द राजा साब' सिनेमातील 'सहाना सहाना' गाण्याच्या लाँच इव्हेंटमध्ये असं काहीतरी घडलं की, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. इव्हेंट संपल्यावर निधी अग्रवाल तिच्या गाडीच्या दिशेनं निघाली. पण, तिला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी झुंबड उडालेली. निधी तिच्या कारकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना, लोकांनी तिला कार्यक्रमस्थळाबाहेर घेरलं. बरेच लोक तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे ती अस्वस्थ दिसत होती. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. जे अत्यंत धक्कादायक आहेत.
व्हिडीओमध्ये, निधीला तिच्या कारपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. इव्हेंटमधून बाहरे पडताच गर्दी तिला घेरते. त्यातून वाट काढत ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते, पण त्या गर्दीत तिला अत्यंत वाईट अनुभव येतो. गर्दी निधीला घेराव घालते. कुणी तिला ओढतं, तर कुणी तिला ढकलतं, कुणी तिला स्पर्श करतं, तर कुणी तिला गाडीजवळ जाण्यापासून रोखतं... तिचे बॉडीगार्ड तिथू असतात, पण तेसुद्धा गर्दीपुढे हतबल होतात. निधीला जोरदार धक्काबुक्की केली जाते. बऱ्याच प्रयत्नांनंतर निधी अखेर तिच्या गाडीपर्यंत पोहोचते. पण त्या गाडीच्या आतही तिला जाणं अशक्य होऊन जातं. तिचे बॉडीगार्ड्स अक्षरशः तिला गाडीत कोंबतात. निधी गाडीत गेल्यावर खूपच चिडते. तिची अवस्था अक्षरशः अस्थाव्यस्थ झालेली असते. जे घडलं त्याचा तिला जबर धक्का बसलाय, हेसुद्धा व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं. निधीसोबत जे घडलं ते अत्यंत निंदनिय होतं. त्या गर्दी निधीला धक्काबुक्की करणारे, तिला ओढणारे, तिला स्पर्श करणारे मुळी चाहते नव्हतेच, ते तर हुल्लडबाज होते. जे अगदी जंगली श्वापदासारखे अभिनेत्री निधी अग्रवालवर तुटून पडले होते.
चिन्मयी श्रीपादाकडून नाराजी व्यक्त
निधी अग्रवालशी संबंधित घटनेवर नाराजी आणि संताप व्यक्त करताना गायिका चिन्मयी श्रीपादानं लिहिलंय की, "काही पुरुष तरसापेक्षाही वाईट वागतात. तरसाचा अपमान का करायचा? असंही म्हणता येईल की, गर्दी समान विचारसरणीच्या पुरुषांनी भरलेली आहे... ते अशा प्रकारे एका महिलेला त्रास देतील, देव त्या सर्वांना घेऊन दुसऱ्या ग्रहावर का सोडत नाही?"
निधीसोबतचा प्रकार पाहून नेटकरीही नाराज
अभिनेत्री निधी अग्रवालचा व्हिडीओ अत्यंत संतापजनक आणि तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी निधीला दिलेल्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. अनेक सोशल मिडिया युजर्सनी चाहत्यांच्या वागण्यावर टीका केली आहे. ते अत्यंत बेजबाबदार आणि असुरक्षित असल्याचंही म्हटलं आहे.
एका युजरनं लिहिलंय की, "#TheRajaSaab गाण्याच्या लॉन्चवेळी #NidhhiAgerwal सोबत अत्यंत भयावह घटना घडली. क्राउड मॅनेजमेंट खूपच गरजेचा आहे...", तर दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलंय की, "#TheRajaSab गाण्याच्या लॉन्चवेळी चाहत्यांकडून #NidhhiAgerwal घेरल्याचा संतापजनक फुटेज. जर गर्दीनं जरासा जरी समजूतदारपणा दाखवला असता, तर परिस्थिती खूप चांगली असती..."
आणखी एका युजरनं लिहिलंय की, "गर्दीला दोष देऊ नका... फिल्म टीमला दोष द्या... ते असाच मूव्ही इव्हेंट प्लान करतात का? कारण ही फिल्म बिग बजेट फिल्म आहे... आणि सर्वांनाच माहीत आहे की, लुलु मॉलच्या आसपास किस्ती हॉस्टल्स आहेत, तर लुलु मॉलची लॉबीसुद्धा खूप लहान आहे. सर्व खराब मॅनेजमेंटमुळे झालंय..." दरम्यान, प्रभास स्टारर 'द राजा साब' सिनेमाचं बजेट 400 ते 450 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :