मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सौंदर्यवान अभिनेत्री समंथा रुत प्रभू (Samantha Ruth Prabhu) प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. अलिकडच्या काळात समंथा व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. आता समंथा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.


समंथा रुथ प्रभू रिलेशनमध्ये?


गेल्या काही काळापासून तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. घटस्फोट आणि त्यानंतर गंभीर आजारपण यातून सावरताना तिला तारेवरची कसरत लागली. त्यानंतर आता पुन्हा ती लवकरच चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. आता तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची चाहूल लागल्याची चर्चा रंगली आहे. समंथाच्या नवीन सोशल मिडिया पोस्टमुळे या चर्चा रंगल्या आहेत.


अभिनेत्री समंथाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची चाहूल


अभिनेत्री समंथाने नुकतीच इंस्टाग्राम अंकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. समंथाने चाहत्यांना एक हिंट दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने डेटिंगबद्दल लिहिलं आहे. ही पोस्ट पाहिल्यावर तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाल्याचा अंदाज लावला जात आहे. समंथाची पोस्ट पाहिल्यानंतर, ती एखाद्या व्यक्तीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.


खास इंस्टाग्राम पोस्टनं वेधलं लक्ष


समंथाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून. यापोस्टमध्ये दोन फोटो असून एका फोटोत ती स्वतः दिसत आहे, तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिच्या हातात एक चिट दिसत आहे. त्यावर लिहिलं आहे Find Hon हे शब्द दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण चिट आहे, ज्यावर Find Honey on 01/08 असं लिहिलं आहे. (Samantha Ruth Prabhu Dating Rumors)






पुढील आठवड्यात शूटिंगला सुरुवात


अभिनेता अली फजल अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) स्क्रिन शेअर करणार आहे. अली फजल आणि समंथा आगामी 'रक्त ब्रह्मांड' या वेब सीरिजमध्ये एकत्र झळकणार आहेत. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'रक्त ब्रह्मांड' वेब सीरिजची संपूर्ण कास्ट फायनल झाली असून याचं शूटिंग पुढील आठवड्यात मुंबईत सुरू होणार आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोरच जया बच्चन आणि रेखानं मारली मिठी, अवॉर्ड शोमधील व्हिडीओ व्हायरल