Samantha Instagram Account : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Samantha) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो समंथा सोशल मीडियावर पोस्ट करते. काही दिवसांपूर्वी समंथाच्या अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली. ज्यामुळे तिचे अकाऊंट हॅक झालं आहे, असं तिच्या चाहत्यांना वाटलं. आता समंथाच्या मॅनेजरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन समंथाच्या  इंस्टाग्राम अकाऊंटबाबत सांगितलं आहे. 


मॅनेजरनं शेअर केली पोस्ट
समंथाची डिजिटल मॅनेजर सेशांका बिनेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन एक टेक्नीकलर ग्लिच झाल्याची माहिती दिली. या ग्लिचमुळे क्रोस पोस्टिंग झालं असंही सेशांकानं सांगितलं. पोस्टमध्ये सेशांकानं लिहिलं, 'टेक्निकल ग्लिचमुळे समंथाच्या अकाऊंटवरुन क्रॉस पोस्ट करण्यात आलं. आम्ही या गोष्टीची माहिती शोधत आहोत. तुम्ही कन्फ्यूज झाला असाल तर आम्ही तुमची माफी मागतो. ' सेशांकानं शेअर केलेल्या पोस्ट समंथानं रिपोस्ट केली. 


सेशांकाची पोस्ट:




समंथाचे आगामी चित्रपट
नुकतीच समंथाच्या ओह बेबी या चित्रपटाला रिलीज होऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये समंथासोबतच लक्ष्मी आणि नागा शौर्य यांनी प्रमुख भूमिका सकारली. या चित्रपटाचे दिग्दर्शन बीवी नंदिनि रेड्डी यांनी केलं होतं. शकुंतलम हा समंथाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या  सिटाडेल या चित्रपटामधून समंथा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात समंथासोबत वरुण धवन देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. अरेंजमेंट्स ऑफ लव्ह या हॉलिवूड चित्रपटामध्ये देखील समंथा काम करणार आहे. समंथाचा 'यशोदा' हा सायन्स फिक्शन-थ्रिलर सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात समंथा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. सिनेमात समंथासोबत वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा हे कलाकारदेखील दिसणार आहेत.


हेही वाचा: