Naga Chaitanya on Divorce with Samantha : अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या. काही नेटकऱ्यांनी समंथा आणि नागा चैतन्यला तेव्हा ट्रोल देखील केले होते. पण घटस्फोटाबाबतची पोस्ट समंथानं सोशल मीडियावरून डिलीट केली आहे.
समंथानं तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या होत्या. आता ती पोस्ट समंथानं डिलीट केली आहे. त्यामुळे आता समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
पोस्टमध्ये समंथाने लिहिले होते, 'आमच्या सर्व हितचिंतकांसाठी.. खूप विचार केल्यानंतर, चैतन्य आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पती-पत्नीसारखे आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही दहा वर्षांहून अधिक काळ मित्र आहोत जे आमच्या नात्याचा आधार होता. आमच्यात मैत्री कायम राहील. आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमच्या या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या दोघांनाही पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. तुमच्या सर्वांच्या समर्थनाबद्दल खूप आभार.'
समंथा आणि नागा चैतन्यची अशी होती लव्ह स्टोरी
‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले.
संबंधित बातम्या
The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेल्यानं शैलेश लोढा ट्रोल; नेटकरी म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha