Tejaswini Lonare Samadhan Sarvankar: समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांच्या लग्नाची एकच चर्चा झाल्यानंतर लग्नानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर त्यांच्या घरातील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहताच अनेकांचे लक्ष या घराकडे वेधले गेलेय. घराच्या सजावटीत कुठेही भडकपणा न करता साधेपणा आणि टापटिप रचनेमुळे या व्हिडिओची चर्चा आहे. पूर्णपणे व्हाईट आणि ग्रे रंगात या घराची कलर थीम करण्यात आली आहे.
व्हाईट थीम घर, प्रशस्त खोल्या
हे घर प्रामुख्याने व्हाईट थीममध्ये सजवलेले असून त्यामुळे संपूर्ण घरात भरपूर प्रकाश असल्यानं, शांत आणि मोकळे दिसतेय. पांढऱ्या रंगामुळे घरात प्रकाश अधिक प्रमाणात पसरतो आणि त्यामुळे प्रत्येक खोली अधिक प्रशस्त वाटते. आवश्यक तेवढ्याच फर्निचरचा वापर केल्यामुळे घरात नीटनेटकेपणा आणि मोकळेपणा टिकून राहिलेला दिसतोय.
घराच्या इंटिरिअरमध्ये हलक्या रंगसंगतीचा आणि नैसर्गिक घटकांचा सुंदर वापर करण्यात आला आहे. छोट्या आकाराची रोपं, साधे शोपीस आणि सौम्य रंगांचे पडदे घराच्या सौंदर्यात भर घालतात. या सर्व घटकांमुळे घरात सकारात्मक आणि शांत वातावरण तयार होत असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळेच समाधान सरवणकर यांचे हे घर अनेकांना भावलं आहे.
व्हाईट थीमला राखाडी कॉन्ट्रास्ट
लिव्हिंग रूममध्ये लावलेले राखाडी रंगाचे टीव्ही युनिट व्हाईट थीमसोबत कॉन्ट्रास्ट निर्माण करते. हे युनिट घराला आधुनिक लुक देत असतानाच साधेपणाही देताना दिसतंय . मोजक्या वस्तू आणि फर्निचरमुळे लिव्हिंग एरिया अधिक मोकळा वाटतो.
घरात विविध ठिकाणी ठेवलेली हिरवीगार झाडे सजावटीला नैसर्गिक स्पर्श देतात. खिडकीजवळ, लिव्हिंग रूममध्ये किंवा कोपऱ्यांमध्ये ठेवलेली ही झाडे घरात ताजेपणा आणतात.
व्हाईट थीमला कॉन्ट्रास्ट पडदे
व्हाईट थीमला पूरक ठरणारे राखाडी रंगाचे पडदे घराच्या सजावटीत संतुलन साधतात. पांढऱ्या भिंतींवर हे पडदे सौम्य विरोधाभास निर्माण करतात, ज्यामुळे खोली अधिक आकर्षक दिसते. राखाडी रंगामुळे घराला आधुनिक आणि नीटस लुक मिळतो. या घराच्या सजावटीत आरामाला विशेष महत्त्व देण्यात आलेले दिसते. जड किंवा भडक डेकोर टाळून साध्या, उपयोगी आणि रोजच्या वापरासाठी सोयीस्कर वस्तूंची निवड करण्यात आली आहे.
व्हाईट आणि राखाडी रंगांच्या संयोजनात घरात हलकासा गोल्डन टच देण्यात आला आहे. हा रंग मर्यादित प्रमाणात वापरल्यामुळे भडक न वाटता घराच्या सौंदर्यात उठाव आणतो. फोटो फ्रेम्स, लाइट्स किंवा छोट्या सजावटीच्या वस्तूंमध्ये दिसणारा गोल्डन रंग घराला सौम्य लक्झरी लुक देतो. साध्या सजावटीतही हा टच घराला खास आणि एलिगंट बनवतो.