Horoscope Today 4 January 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 4 जानेवारी, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या दरम्यान पंचांक योग निर्माण होणार आहे. सूर्य आणि शनि ग्रह मिळून हा योग निर्माण करणार आहे. विशेष म्हणजे 2026 या वर्षातला हा पहिला पंचांक योग आहे. त्यामुळे अनेक राशींना याचा लाभ मिळणार आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
फार मोठा संघर्ष न करता काम करण्याची पद्धत राहील प्रकृती स्वास्थ चांगले राहील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
एक प्रकारचा उत्साह आज जाणवणार आहे बौद्धिक कसरती करण्यामध्ये तत्परता ठेवाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
महिलांच्या हातून लिखाण होईल हातून थोडा वेंधळेपणा होऊ शकतो त्यात सुधारणा करायला हवी.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासामध्ये सुधारणा झाल्याचे लक्षात येईल हे यश टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने एकाग्रता वाढवायचा प्रयत्न करावा लागेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
बाजारातील चढ-उतारांचा अंदाज घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
एखाद्या धाडस अंगलट येण्याची शक्यता आहे तेव्हा व्यवहार सांभाळून करावेत.
तूळ रास (Libra Horoscope Today)
असतील आणि चंचल स्वभावामुळे एक ना धड भराभर चिंध्या हा अनुभव येऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
आर्थिक चिंता हितचिंतकांच्या मदतीमुळे कमी होईल परंतु अंथरूण पाहून पाय पसरणे योग्य ठरेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आर्थिक चिंता हितचिंतकांच्या मदतीमुळे कमी होईल परंतु अंथरूण पाहून पाय पसरणे योग्य ठरेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
महिलांच्या गृह सौख्यात भर पडेल नोकरी व्यवसायात जेवढे काम कराल त्यामानाने लाभ चांगला मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आपली लायकी इतरांपेक्षा जास्त आहे हे कायम दुसऱ्याच्या मनावर ठसवण्याचा तुमचा अट्टाहास काही वेळेस महागात पडेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
काम आणि लाभ यांचे समीकरण उत्तम जमल्यामुळे नवीन बेत आखले जातील.
हे ही वाचा :