Ranbir Kapoors Animal Sequel Update: 2023 साली प्रदर्शित झालेला अ‍ॅक्शन फिल्म अ‍ॅनिमल ब्लॉकबस्टर  ठरला. रणबीर कपूर अभिनीत या सिनेमाने 917 कोटींची वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कमाई केली. या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका साकारणारी सलोनी बत्रा हिने अलिकडेच अ‍ॅनिमल 2 या चित्रपटाबाबत चाहत्यांना मोठी हिंट दिली आहे.  सलोनी बत्रा ही नुकतीच Amazon MX प्लेअरची वेब सिरीज 'भय'मधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तिने आपल्या दमदार भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले. ती लवकरच अ‍ॅनिमल 2 चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दुसर्‍या सिक्वेलचे नाव अ‍ॅनिमल पार्क किंवा अ‍ॅनिमल 2 असे असू शकते. 

Continues below advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅनिमल चित्रपटाचे बजेट सुमारे 200 कोटी होते. या सिनेमाने वर्ल्डवाइड 900 कोटीहून अधिक कमाई केली.  संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल हा चित्रपट 2023  मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक बनला.

प्रवास खूप खडतर

झूमला दिलेल्या मुलाखतीत सलोनी बत्रा हिने  अॅनिमल 2 चित्रपटाबाबत खुलासा आणि करिअरच्या प्रवासाबाबतही माहिती शेअर केली. बॉलिवूडमधील आउटसाइडर व्यक्ती म्हणून तिच्या प्रवासाबाबत आणि आव्हानांबद्दलही  तिनं मोकळेपणाने भाष्य केलं आहे. सलोनी म्हणाली, "अभिनय शिकण्याची एक रोलरकोस्टर राईड होती.  हा खरंतर माझ्यासाठी सरळ मार्ग नव्हता.   मला वाटते की जीवन प्रत्येकासाठी असेच असते.  कारण आयुष्याच्या काही टप्प्यांवर तुम्हाला पाठिंबा नसतो. स्वत:चे  संघर्ष असतात. या प्रवासात मी खूप काही शिकले आहे", असं सलोनी म्हणाली. 

Continues below advertisement

"या प्रक्रियेतून गेल्याचा मला आनंद आहे. कारण यातून मला खूप काही शिकायला मिळाले.  मी मुंबईत आले. मला काम मिळाले.  मला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं.  माझं बॅकग्राऊंड  डिझाइनमध्ये आहे.   मला आजही कॅमेरासमोरचा पहिला दिवस आठवतो.  कोणीही किंवा कोणत्याही परिस्थितीत मला खाली आणण्याचा प्रयत्न केला तरी मला  पुढे जात राहायचं आहे. हे कठीण आहे. पण मला पुढे जायचं आहे", असं सलोनी म्हणाली. 

अॅनिमल 2बाबत  सलोनी म्हणाली, "मी अॅनिमल चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आहे. प्रेक्षकांनी अॅनिमल चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं.  अॅनिमल चित्रपट सुपरहिट ठरला. अॅनिमल 2 चित्रपटातही अधिक अॅक्शन आणि मनोरंजनने परिपूर्ण असेल", असा दावा सलोनीने झूमच्या मुलाखतीत केला. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..