Alia bhatt wedding saree sabyasachi details: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी 14 एप्रिल 2022 रोजी विवाह केला होता. हा विवाहसोहळा (Alia Wedding Look) एका खासगी समारंभात मुंबईतील घरात पार पडला. आलियानं तिच्या खास दिवसासाठी पारंपारिक लाल साडी सोडून पेस्टल रंगाची एम्ब्रॉयडर्ड ऑर्गेन्झा साडी निवडली होती. हा लूक सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केला होता. आता, आलिया भट्टने तिच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल खुलासा केला आहे. तिनं लग्नाच्या दिवशी साडी का नेसली होती? याबाबत आलियानं नुकतीच माहिती दिली.
वॉगला दिलेल्या मुलाखतीत, आलियाने कबूल केले की, ती साडी गर्ल आहे. साडी नेसणे आवड असल्याचं तिनं कबूल केलं. लग्नाच्या साडीबाबत आलिया भट्ट म्हणाली, "मी बऱ्याचदा सांगितलं आहे की, मला साडीमध्ये नेहमी आरामदायी वाटते. जेव्हा मी सब्यसाचीसोबत पहिला झूम कॉल केला होता, तेव्हा त्यांनी मला विचारले होते की, तुला लग्नात नेमकं काय घालायचं आहे? तेव्हा माझं ठरलं होतं की, मला कंम्फर्टेबल राहायचं आहे, मला माझ्या खास दिनी साडी नेसायची होती, हे माझं ठरलं होतं", असं आलिया म्हणाली.
यानंतर सब्यसाचीने आलियाला तिच्या लग्नाच्या साडीच्या रंगाबद्दल विचारले. तेव्हा आलियाने पांढरे - सोनेरी रंगाचे हवे आहे, असं तिनं उत्तर दिलं. तेव्हा सब्यसाचीने, (Chai - Dipped White) रंगाची साडी तयार करूयात. तसेच ऑर्गेन्झा साडी बनवू, कारण ते सोपे आणि छान दिसेल, असं सांगितले.
तिच्या खास दिवसाची आठवण करून देताना आलियाने सांगितले की, सब्यसाचीने तिच्या आणि रणबीरच्या वैयक्तिक भावना लक्षात घेऊन साडी कस्टमाइज केली आहे. "आमच्या साडीत एक लांब ट्रेन दिसत होती. सब्यसाचीने माझ्या लग्नाच्या दिवसाचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी ती कस्टमाइज केली होती. या साडीवर 'Mrs. Hipster' लिहिले होते. जे माझ्या आणि माझ्या पतीमधील एक अंतर्गत रहस्य आहे". लग्नाच्या लूकमधील कलेक्शनमध्ये एक अनकट ज्वेलरी सेट पण होता, अशी माहिती आलिया भट्टने दिली.
"मला एक मोठा नेकपीस, मोठे कानातले आणि एक मांग टिका पण हवा होता. सॉफ्ट ग्लॅमर मेकअपमुळे माझा लूक पूर्ण झाला. ब्लश्ड चीक, न्यूड लिप्स आणि मस्करामुळे आयलॅशेज खूप सुंदर दिसत होते. सॉफ्ट वेवी आणि उघड्या केसांमुळे ब्रायडल लूक पूर्ण झाला होता", असं आलिया म्हणाली.