Akola Municipal Corporation Election 2025 News Marathi : अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. भाजपसह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा सुरू करत निवडणुकीच्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः भाजप आणि काँग्रेस यांचा भर शहरातील कोणत्या प्रभागातून कोण निवडून येऊ शकतो, याचा आढावा घेऊन त्यानुसार रणनीती ठरवण्यावर आहे.

Continues below advertisement

अकोला महापालिकेचा इतिहास आणि कार्य (History of Akola Municipal Corporation) -

अकोला महानगरपालिकेचा इतिहास म्हणजे अकोला शहराच्या प्रशासकीय उत्क्रांतीचा भाग आहे, जिथे ब्रिटिश काळात 1888 च्या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झाली, त्यानंतर अकोला जिल्हा निजाम राजवटीतून ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर (1853) प्रशासकीय रचना हळूहळू विकसित झाली आणि आता अकोला महानगरपालिका (Akola Municipal Corporation) ही शहराची मुख्य नागरी संस्था म्हणून कार्य करते, जी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या माध्यमातून शहराचा विकास आणि प्रशासन पाहते. अकोला महानगरपालिकेचा इतिहास हा ब्रिटिश काळातील प्रशासकीय बदलांमधून विकसित झाला आहे, जिथे शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरी प्रशासनाची स्थापना झाली आणि आज ती अकोला शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कार्यरत आहे. 

Continues below advertisement

गठबंधनांच्या घोषणेकडे इच्छुकांचे लक्ष (Akola Municipal Corporation Election Interested candidates)-

भाजपने महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी पक्ष नेतृत्वाकडे सादर केली आहे. दरम्यान, अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांची महाविकास आघाडी नेमकी केव्हा अधिकृत होणार, याबाबत अकोल्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष सध्या गठबंधनांच्या घोषणेकडे लागले असून त्यानंतरच उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

-महापालिकेची स्थापना : 2001-नगरसेवकांची संख्या : 80-मागील निवडणुकीच्या निकालाचे टेबल आणि त्या टेबलचं विश्लेषण : 

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Party-wise strength in Akola Municipal Corporation) -

एकूण जागा : 80भाजप : 48काँग्रेस : 13शिवसेना : 08राष्ट्रवादी : 05वंचित बहूजन आघाडी : 03एमआयएम : 01अपक्ष : 02

सध्याचं राजकारण (Akola Municipal Corporation Current politics)-

अकोला महापालिकेत सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येणार की नाही याबद्दल अद्यापही स्पष्टता नाही. मात्र ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार हे स्पष्ट झाले आहे. यासोबतच महायुती एकत्र लढणार असल्यास स्पष्ट केल्यानंतरही तिन्ही पक्षांच्या जागेवाटपाचा फॉर्म्युला अद्याप स्पष्ट झाला नाही.‌ भाजपच्या बंडखोर नेत्यांची एक नवी आघाडी शहरात उदयाला येत आहे. आघाडीत भाजप आणि इतर पक्षाचे बंडखोर सहभागी होण्याची शक्यता आहे.‌ यासोबतच शहरात काही भागांमध्ये ताकद असलेल्या वंचितची भूमिका महत्त्वाची आहे.‌ मातृ वंचित कोणासोबत जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

यंदाच्या निवडणुकीतील इतर महत्वाचे मुद्दे (Akola Municipal Corporation Important issues) - 

या महापालिका निवडणुकीत रस्ते आणि पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासोबतच शहरात झालेल्या विकास कामांच्या दर्जाबद्दलही मोठं प्रश्नचिन्ह लोकांमध्ये आहे. मी काय शहरातील अनेक भागांमध्ये विकासाचा असंतुल असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.‌ त्यामुळे काही भागात खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे तर झोपडपट्टी असलेल्या वस्त्यांमध्ये विकासाचा वेग कमी असल्याचे चित्र आहे.

2017 च्या निवडणुकीतील अकोला महापालिकेतील विजयी उमेदवारांची यादी (List of winning candidates in Akola Municipal Corporation 2017 Elections ) -

प्रभाग क्रमांक 01 : 1) अ - रहीम पेंटर : राष्ट्रवादी 2) ब - अजरा नसरीन : काँग्रेस 3) क - शेख अख्तारबी हनिफ : काँग्रेस 4) ड - मोहम्मद नौशाद : काँग्रेस

प्रभाग क्रमांक 02 - 5) अ - पराग कांबळे : काँग्रेस 6) ब - अनिता चौधरी : भाजप 7) क - चांदणी शिंदे : काँग्रेस 8) ड - मोहम्मद इकबाल सिद्दीकी

प्रभाग क्रमांक 03 - 9) अ - हरिष काळे : भाजप 10) ब - गीतांजली शेगोकार : भाजप 11) क - धनश्री देव-अभ्यंकर : भारिप-बमसं 12) ड - बबलु जगताप : भारिप-बमंस

प्रभाग क्रमांक 04 - 13) अ - संतोष शेगोकार : भाजप 14) ब - अनुराधा नावकार : भाजप 15) क - पल्लवी मोरे : भाजप 16) ड - मिलिंद राऊत : भाजप

प्रभाग क्रमांक 05- 17) अ - सुभाष खंडारे : भाजप 18) ब - अर्चना मसने : भाजप 19) क - रश्मी अवचार : भाजप 20) ड - विजय अग्रवाल : भाजप

प्रभाग क्रमांक 06 - 21) अ - आरती घोगलिया : भाजप 22) ब - राहूल देशमुख : भाजप 23) क - सारीका जैस्वाल : भाजप 24) ड - राजेंद्र गिरी : भाजप

प्रभाग क्रमांक 07 - 25) अ - सुवर्णलेखा जाधव : काँग्रेस 26) ब - साजिदखान मन्नानखान पठाण : काँग्रेस 27) क - माधुरी मेश्राम : अपक्ष 28) ड - मोहम्मद इरफ़ान काँग्रेस

प्रभाग क्रमांक 08 - 29) अ - तुषार भिरड : भाजप 30) ब- रंजना विंचणकर : भाजप 31) क - नंदा पाटील : भाजप 32) ड - सुनील क्षीरसागर : भाजप

प्रभाग क्रमांक 09 - 33) अ - शितल रामटेके : राष्ट्रवादी 34) ब - शशिकांत चोपड़े : शिवसेना 35) क - शितल गायकवाड : राष्ट्रवादी 36) ड - मोहम्मद मुस्तफा : एम.आय.एम.

प्रभाग क्रमांक 10 - 37) अ - अनिल गरड : भाजप 38) ब - मंजुषा शेळके : शिवसेना 39) क - वैशाली शेळके : भाजप 40) ड - सतिष ढगे : भाजप

प्रभाग क्रमांक 11 - 41) अ - जैन्नबी शेख इब्राहीम : काँग्रेस 42) ब - शाहीन अंजूम : काँग्रेस 43) क - जकाऊल हक : अपक्ष 44) ड - डाँ. जिशान हूसेन : काँग्रेस

प्रभाग क्र. 12 - 45) अ - जान्हवी डोंगरे : भाजप 46) ब - हरिश अलिमचंदानी : भाजप 47)क - उषा विरक : राष्ट्रवादी 48) ड - अजय शर्मा : भाजप

प्रभाग क्रमांक 13 - 49) अ - सुजाता अहीर : भाजप 50) ब - अनिल मुरूमकार : भाजप 51) क - सुनिता अग्रवाल : भाजप 52) ड - आशिष पवित्रकार : भाजप

प्रभाग क्रमांक 14 - 53) अ - विशाल इंगळे : भाजप 54) ब - किरण बोराखडे : भारिप - बहुजन महासंघ 55) क - दीपाली जगताप : भाजप 56) ड - मंगेश काळे : शिवसेना

प्रभाग क्रमांक 15 - 57) अ - शारदा खेडकर : भाजप 58) ब - मनिषा भंसाली : भाजप 59) क - अरविंद उर्फ बाळ टाले : भाजप 60) ड - दिप मनवाणी : भाजप

प्रभाग क्रमांक 16 - 61) अ - आम्रपाली उपर्वट : भाजप 62) ब - माधुरी बडोणे : भाजप 63) क - सोनी आहूजा : भाजप 64) ड - फैय्याज खान :  राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 17 - 65) अ - गजानन चव्हाण : शिवसेना 66) ब - प्रमिला गिते : शिवसेना 67) क - अनिता मिश्रा : शिवसेना 68) ड - राजेश मिश्रा : शिवसेना

प्रभाग क्रमांक 18 - 69) अ - सपना नवले : शिवसेना 70) ब -  अमोल गोगे : भाजप 71) क - जयश्री दुबे : भाजप 72) ड - फिरोज खान : काँग्रेस

प्रभाग क्रमांक 19 -73) अ - धनंजय धबाले : भाजप 74) ब - मंगला सोनोने : भाजप 75) क - संजय बडोणे : भाजप 76) ड - योगिता पावसाळे : भाजप

प्रभाग क्रमांक 20 - 77) अ - विजय इंगळे : भाजप 78) ब - सुमन गावंडे : भाजप 79) क - शारदा ढोरे : भाजप 80) ड - विनोद मापारी