बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मधील रियलिटी शोमध्ये सलमान खान विकेंड वारमध्ये निक्की तांबोळीची शाळा घेतना दिसणार आहे. अलीकडेच कलर्स टीव्हीने आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात सलमान खान घरी येतो आणि सर्व स्पर्धकांवर खूप रागावला आणि राखीच्या पलंगाची साफसफाई करताना दिसला आहे. हा प्रोमो व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. बिग बॉस घरात निक्की तांबोळी आणि राखी सावंत यांच्यात भांडण झाले. यावरुन निक्की तांबोळीने राखीचा पलंग साफ करण्यास नकार दिला.
राखी सावंत (Rakhi Sawant) चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. सलमान खानने आपल्या ट्विटर हँडलवरही हा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सलमान लिहितो, की 'जर तुम्हाला बेड व्यवस्थित करायचा नसेल तर काही फरक पडत नाही. मी आलोचं . 'प्रोमो व्हिडिओमध्येही एजाज खान म्हणतो की,' राखीचा पलंग मी व्यवस्थित करणार नाही, असे निक्की तांबोळीने म्हटलंय. 'मला तिचा बेड व्यवस्थित करायचा नव्हता' असे म्हणताना निक्की दिसला. त्यावर सलमान खान म्हणतो, 'तुम्हाला तिचा पलंग व्यवस्थित करायचा नाही तर हरकत नाही, मी लगेच येतो.'
असं म्हणत सलमान बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतो. त्यानंतर सलमान राखीच्या पलंगाची साफसफाई करू लागतो आणि सलमान खान राखीला विचारतो की, "राखी तुझा पलंग व्यवस्थित केला आहे." यावेळ 'कोणतेच काम छोटे किंवा मोठे नाही, हे तुमच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.' असे म्हणत सलमान घराच्या बाहेर पडताना दिसत आहे.