नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून ज्या कोरोना लसीची जनतेला प्रतीक्षा होती, ती संपली आहे. कारण आता येत्या 16 जानेवारी पासून कोरोना लसीकरणाला देशभरात सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर देशातील 50 वर्षांहून अधिक वयाच्या आणि गंभार आजारानेग्रस्त असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. कोरोना लसीकरणाची नोंदणी केली जाणार आहे.


कोविड लस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक


कोरोना लसीसाठी नाव नोंदणीसाठी फोटोसाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, डायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, सेवा ओळखपत्र (फोटोसह) केंद्र/राज्य सरकारद्वारे जारी केलेले पासपोर्ट, आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड, टपाल कार्यालय/बँकेने दिलेला पासबुक फोटो आणि कामगार मंत्रालयाच्या आरोग्य विमा स्मार्ट कार्डसह पेन्शन दस्तऐवज आवश्यक असेल. यापैकी कोणतीही कागदपत्रे असल्यास आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यास सक्षम असाल. यासह 1075 वर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, परंतु त्याआधी लसीकरणाची तारीख जाहीर झाली आहे. या व्यतिरिक्त, लोकांमध्ये लसीसंबंधीची भीती दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवित आहे.


दोन लसींना आपात्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी


इंडिया बायोटेकची कोवॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोविशिल्ड लसीला 3 जानेवारीला आपत्कालीन वापरासाठी मंजूर झाली आहे. कोविशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली आहे.





#BREAKING | 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार | ABP Majha