Salman Khan : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटले जाते. पण, या अभिनेत्याने अद्याप लग्न का केले नाही, असा प्रश्नही प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. या प्रश्नावर प्रत्येक वेळी एक नवीन कारण समोर येते. मात्र, आता हा प्रश्न ऐकून सलमान खानही कंटाळलेला दिसतोय, त्यामुळेच तो देखील या प्रकरणाची खिल्ली उडवतो. एकदा या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानने असंही म्हटलं होतं की, आजकाल लग्नं खूप महाग झाली आहेत. लग्न करण्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात आणि तेवढी संपत्ती त्याच्याकडे नाही.


सलमान खान प्रत्येकवेळी या प्रश्नाचं उत्तर विनोदी शैलीतच देतो. सलमान खानची गणना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते, हे सर्वांनाच माहीत आहे. एवढेच नाही, तर अभिनयाव्यतिरिक्त सलमान खानचे अनेक व्यवसायही आहेत. आतापर्यंत सलमान खानच्या लग्नाच्या कितीतरी बातम्या समोर आल्या आहेत आणि भविष्यातही अनेक गॉसिप्स होत राहतील. या सगळ्या दरम्यान एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खानने लग्न न करण्यामागचे कारण सांगितले आहे. सलमानचं हे कारण खरंच त्याच्या चाहत्यांना खूप भावूक करणारं आहे.


काय होत नेमकं कारण?


सलमान खानने लग्न न करण्यामागे असे एक कारण आहे, ज्यामुळे सामान्य माणूसही त्याच्याशी सहज नाते जोडू शकेल. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि कुटुंब हीच त्याची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अनेकदा त्याचे अभिनेत्रींशी असलेले नाते लग्नाच्या जवळ पोहोचले, परंतु प्रत्येक वेळी तो त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबासारखे महत्त्व देऊ शकला नाही.


दोन वेळा लग्नापर्यंत पोहोचलं होतं नातं!


सलमान खानला वाटतं की, त्याने एखाद्यासोबत नात्यामध्ये यावं आणि त्यानंतर त्या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष देऊ शकला नाही तर? किंवा या नात्याला वेळ देऊ शकला नाही तर... असे म्हटले जाते की, सलमान खानच्या आयुष्यात दोनदा अशी वेळ आली होती, जेव्हा तो लग्न करणार होता. पण, सलमानला नेहमीच भीती वाटत राहिली की, कुटुंबावरचे त्याचे प्रेम त्याच्या जोडीदाराला समजणार नाही, त्यामुळे त्याने नेहमीच एक पाऊल मागे घेतले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha