मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या टायगरच्या फ्रेंचायझीचा तिसरा सिनेमा आता बनण्यासाठी तयार होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा चित्रपट अडकून आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचं चित्रिकरण होऊ शकलेलं नाही. पण आता टायगर 3 चं चित्रिकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सिनेमाचं सगळं शेड्युल लावण्यात आलं आहे. एकदा चित्रिकरण झालं की पुढे दोन महिने सिनेमाचं शूट करण्यात येणार आहे.
मुंबई : सलमान खानचा (Salman Khan) हा महत्वाचा प्रोजेक्ट मानला जातो. सलमान आता या सिनेमावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. या सिनेमाचं चित्रिकरण आता सुरू होणार आहे. पहिल्यांदा सलमान खान युरोपिय देशांत रवाना होणार आहे. येत्या 12 ऑगस्टपासून सुरूहोणारं चित्रिकरण पुढे 50 दिवस चालणार आहे. अनेक देशांमध्ये हे चित्रिकरण चालणार आहे. सुरूवातीला सलमान या चित्रिकरणासाठी जाईल त्यानंतर कतरिना कैफ हे चित्रिकरण चालू करेल. या चित्रपटाचं चित्रिकरण फ्रान्स, आयर्लंड, स्पेन आदी देशांमध्ये होणार आहे. या सिनेमामध्ये मोठा पाठलाग असणार आहे. सलमान युरोपात दाखल झाल्यानंतर सुरूवातीला त्याचे सगळे पहिले शॉट घेण्यात येणार आहेत.
टायगर 3 चं पूर्ण नाव ठरलेलं नाही. पण सध्या त्याला टायगर असंच देण्यात आलं आहे. या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इम्रान हाश्मी (Imran Hashmi) यांची भूमिका असणार आहे. इम्रान या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. या सिनेमात त्याला पाकिस्तान का टायगर असं बिरूद लावलं जाणार आहे. आयएसआय एजंट आणि भारतीय गुप्तचर विभागातला गुप्तहेर टायगर यांच्यातला हा सामना असणार आहे. या सिनेमातली हाणामारी जास्तीत जास्त लार्जर दॅन लाईफ असावी याची काळजी घेतली जाणार आहे. निर्माते आदित्य चोप्रा यांनी या सिनेमसाठी पुरेपूर कंबर कसली आहे. वेगवेगळ्या स्टंट मास्टर्सना या सिनेमासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. या सिनेमाचं बजेट 300 कोटी ठरवण्यात आलं आहे.
सलमान खानसाठी टायगर हा सिनेमा फार महत्वाचा मानला जातो. कारण त्याची मुख्य भूमिका असलेला राधे हा चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आला असला तरी त्याकडे सिनेरसिकांनी दुर्लक्ष केलं. त्या सिनेमाला अनेकवेळा ट्रोल व्हावं लागलं. त्यामुळे आता आगामी सिनेमासाठी सलमानने आपली कंबर कसली आहे. आता येत्या काळात त्याचा मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमावर बेतलेला अंतिम हा सिनेमा येणार आहे. हा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित करत असून, त्यानंतर सलमानने आपलं लक्ष टायगरवर केंद्रित केलं आहे.