Ahaan Panday Father Chikki Panday Shah Rukh Khan Bail Out From Jail: सध्या मोहित सुरी (Mohit Suri) दिग्दर्शित 'सैय्यारा' (Saiyaara Movie) सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालतोय. या सिनेमात दोन नवखे कलाकार झळकले आहेत. दोघांच्या दमदार परफॉर्मन्समुळे सध्या हा सिनेमा कोट्यवधींची कमाई करतोय. या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेल्या अहान पांडेची (Ahaan Panday) सगळीकडे चर्चा रंगली आहे. चोहीकडून त्याच्या अभिनयाचं कौतुक होतंय. पण, तुम्हाला अहान पांडे आणि अनन्या पांडेचं कनेक्शन माहितीय ना? दोघे सख्खी चुलत भावंड आहेत. अनन्या चंकी पांडे (Chunky Panday) यांची मुलगी आहे. तर, अहान चंकी पांडे यांचा सख्खा चुलत भाऊ चिक्की पांडे (Chikki Panday) यांचा मुलगा आहे.
चिक्की पांडे सुप्रसिद्ध बिझनेसमनपैकी एक. पण, तरीसुद्धा चिक्की पांडे यांचा फिल्मी जगतातील सलोखा आहे. कधीकाळी त्यांनी सुपरस्टार शाहरुख खानला (Shah Rukh Khan) तुरुंगातून बाहेर काढलं होतं.
नेमकं काय घडलेलं?
अभिनेता अहान पांडे याचे वडील सुपरस्टार चंकी पांडेचे (Chikki Panday) लहान बंधू. याव्यतिरिक्त शाहरुख खानचे जवळचे मित्र. शाहरुख खानच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात चिक्की पांडे आणि शाहरुख खूप जवळचे मित्र होते. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एकदा शाहरुख खानला तुरुंगात डांबलेलं, त्यावेळी चिक्की पांडे यांनी शाहरुखचा जामीन करुन त्याची सुटका केलेली.
1994 मध्ये किंग खान शाहरुख खानच्या चर्चा सगळीकडे होत्या. ऐन उमेदीच्या काळात कुणा एका पत्रकारानं एका मॅग्झिनमध्ये शाहरुख खानवर लेख लिहिलेला. त्या लेखातून आपला अपमान झाल्याची भावना शाहरुखच्या मनात निर्माण झाली. शाहरुखनं कोणताही मागचा पुढचा विचार न करता, त्या पत्रकाराला थेट धमक्या दिल्या. प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं आणि शाहरुख खानचा ताब्यात घेतलं गेलं. त्यानंतर चिक्की पांडे आणि मराठमोळे बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी जामीन करुन तुरुंगातून शाहरुखची सुटका केली होती.
अशाप्रकारे, अहान पांडेच्या वडिलांनी शाहरुखची तुरुंगातून सुटका करुन त्याची मदत केली होती. आपल्या लाडक्या मित्राच्या पडत्या काळात, जेव्हा त्याला अगदी गरज होती त्यावेळी चिक्की पांडे शाहरुख खानसाठी धावून आले आणि त्याला मदत केली. याशिवाय चिक्की पांडे यांनी आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंडस्ट्रीतला एक काळ असा होता, जेव्हा गुण्यागोविंदानं एकत्र नांदणारे दोन खान शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यावेळीही चिक्की पांडे पुढे आले आणि त्यांनी दोन्ही खान्समध्ये समेट घडवून आणला. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत चिक्की पांडे यांनी शाहरुख सलमान यांच्यातला वाद मिटवून समेट घडवून आणला.
चिक्की पांडे कोण आहे?
चिक्की पांडेचं खरं नाव आलोक शरद पाडे. चिक्की एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. चिक्की पांडे लाईमलाईटच्या जगापासून दूर असले, तरीसुद्धा त्यांचा मोठा भाऊ चंकी पांडे व्यतिरिक्त, त्यांचं बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं चांगलं नेटवर्क आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासारख्या मोठ्या स्टार्ससोबतच्या मैत्रीचे चिक्की पांडे यांचे किस्से सर्वश्रूत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ayesha Jhulka Birthday: 'पहला नशा पहला खुमार...'मधली आमिर खानची गोंडस हिरोईन आता कशी दिसते?