Ayesha Jhulka Struggle Story: नव्वदच्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूड (Bollywood News) गाजवलं. पण, जसजसा काळ सरला, तसतशा त्या रुपेरी पडद्यापासून काहीशा दुरावल्या. त्यापैकी एक नाव म्हणजे, आयशा झुल्का. त्या काळात आयशानं अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि आमिर खान (Aamir Khan) यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं. आयशानं बॉलिवूडमध्ये अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले, ज्यामध्ये ती लीड अॅक्ट्रेस होती. दरम्यान, काळानुसार आयशाची क्रेझ कमी होऊ लागली आणि 2000 सालापर्यंत ती चित्रपटांमधून जवळजवळ गायबच झाली. 

28 जुलै 1972 रोजी श्रीनगरमध्ये जन्मलेल्या आयशा झुल्काचे (Ayesha Jhulka) वडील वायुसेनेत विंग कमांडर होते आणि तिची आई कॉस्च्युम डिझायनर होती. बालकलाकार म्हणून आयशानं सर्वात आधी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिनं कैसे कैसे लोग (1983) या चित्रपटात काम केलं. मोठी झाल्यानंतर, आयशाचा पहिला चित्रपट तेलुगूमध्ये आला, ज्याचं नाव नेती सिद्धार्थ (1990) होतं. 1991 मध्ये आयशानं सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तिचा पहिला हिंदी चित्रपट 'कुर्बान' होता, जो सुपरहिट ठरला.

आयशा झुल्काचं फिल्मी करिअर कसं होतं?

1992 मध्ये आयशा झुल्काचे एकापाठोपाठ एक असे, 4 सिनेमे प्रदर्शित झाले, ज्यात अयुब खानसोबत 'माशूक', अक्षय कुमारसोबत 'खिलाडी', आमिर खानसोबत 'जो जीता वही सिकंदर' आणि अरमान कोहलीसोबतचा 'अनाम' यांचा समावेश आहे. या सिनेमांपैकी अक्षय कुमार आणि आमिर खानसोबतचे चित्रपट सुपरडुपर हिट ठरले. एका फटक्यात आयशा बॉलिवूडची क्वीन बनली. तिचा समावेश त्या काळातील बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये केला जाऊ लागला. 

आयशा झुल्कानं त्या काळात 'दलाल', 'संग्राम', 'बलमा', 'मासूम', 'मेहेरबान', 'मुकद्दर' आणि 'चाची 420' असे अनेक उत्तम चित्रपट केले. अनेक वर्षांनंतर आयशाने जिनियस (2018) या चित्रपटात काम केले. यानंतर तिने आणखी काही चित्रपट केले. आयशा झुल्काने 'कभी कभी' आणि 'सेलिब्रेटी मास्टर शेफ' सारखे शो देखील केले. त्याचबरोबर तिने 'हुश हुश' (2022) आणि 'हॅपी फॅमिली' (2023) सारख्या वेब सीरिजही केल्या.

आयशा झुल्का सध्या काय करते? 

2003 मध्ये आयशा झुल्का हिनं बांधकाम क्षेत्रातील दिग्गज समीर वाशीसोबत लग्न केलं. एका मुलाखतीत आयशानं सांगितलं होतं की, तिनं आणि तिच्या पतीनं मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. हे जोडपं अजूनही एकत्र आहे, पण आयशा आता पुन्हा अॅक्टिंगमध्ये सक्रिय झाली आहे. आयशा अनेक वर्षांपासून इंस्टाग्रामवर सक्रिय आहे आणि चाहत्यांना तिचे अपडेट्स देत असते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kuch Kuch Hota Hai Anjali Is Now 36 Years: 'कुछ कुछ होता है'ची छोटी अंजली झालीय 36 वर्षांची; यंग ब्युटीफुल लेडीचे फोटो पाहिलेत का?