Kannappa First Glimpse of Akshay Kumar: बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'स्काय फोर्स' (Sky Force) हा चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अभिनेत्यानं त्याच्या बहुप्रतिक्षित 'कन्नप्पा' (Kannappa Movie) चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अक्षयचीच चर्चा होत आहे. पोस्टरमध्ये खिलाडी कुमार भगवान शंकराच्या अवतारात दिसत आहे. एका हातात डमरू आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ, अक्षयचा लूक पाहून बम बम भोलेचा जयघोष मुखी येतोय. ज्याला पाहून चाहतेही कमेंट सेक्शनमध्ये चित्रपट पाहण्याचा त्यांचा उत्साह शेअर करताना दिसत आहेत. 


कन्नप्पाचं पोस्टर, रिलीज डेट जाहीर


इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारनं एक क्लासी कॅप्शन लिहिलं आहे. #कन्नप्पासाठी महादेवाच्या पवित्र आभामध्ये पाऊल टाकत आहे. ही महाकाव्य कथा जिवंत करणं हा एक सन्मान आहे. या दिव्य प्रवासात भगवान शिव आपल्याला मार्गदर्शन करोत. ओम नमः शिवाय! यासोबतच, अभिनेत्यानं भगवान शिव ॐ आणि हर हर महादेव ॐ हे हॅशटॅग जोडले आहेत.






पोस्ट शेअर केल्यानंतर लोकांनी रिअॅक्शन देणं सुरू केलं आहे. एका युजरनं लिहिलं आहे की, "सब का होगा बेड़ा पार ,अगर महादेव की भक्ति में डूबेगा यह संसार हर हर महादेव." आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, रियल हिरो अक्षय कुमार. तिसऱ्या युजरनं लिहिलं आहे की, "एक्साइटमेंट आहे, सर या मूव्हीची.", तर एक युजर म्हणतो की, "2025 खूप सुंदर जाओ आपल्यासाठी. महादेवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी."                


दरम्यान, सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट एप्रिल 2025 मध्येच प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जर या दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर झाली, तर बॉक्स ऑफिसवर कोण जिंकणार? हे निश्चित आहे.                                        


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'