Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हा त्याच्या अभिनयाच्या जोरावर आजपर्यंत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हम साथ साथ हैं, दिल चाहता हैं, हम तुम या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. त्यानंतर त्याने 2012 मध्ये करिना कपूर हिच्यासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्याआधी त्याने 1991 मध्ये अम्रीता सिंह हिच्यासोबत लग्न केलं. 


पण या अभिनेत्याच्या आयुष्यात एक काळ असा होता की, त्याला त्याचं करिअर आणि प्रेम या दोघांमध्ये निवड करण्यास सांगितलं गेलं. त्यावेळी सलमानने घेतलेल्या निर्णयाचं आजही तितकच कौतुक होतं. 


नेमकं काय घडलं होतं?


सैफ अली खान बेखुदी या चित्रपटातून पदार्पण करणार होता. पण या सिनेमावेळी दिग्दर्शक राहुल रवैल याने त्याच्यासमोर एक अट ठेवली त्यानंतर सैफजवळ फक्त दोन पर्याय होते. त्यावेळी त्याला सांगण्यात आलं की, एकतर गर्लफ्रेंड बनव किंवा सिनेमांमध्ये काम कर. पण तेव्हा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देत सैफ अली खानने गर्लफ्रेंडची निवड केली. 


सैफने सिनेमाला दिला नकार


या गोष्टीनंतर सैफ अली खानने सिनेमा करण्यास नकार दिला. त्यानंतर बेखुदी या सिनेमातून काजोल आणि कमल सदाना हे मुख्य भूमिकेत दिसले. हा सिनेमा 1992 मध्ये भेटीला आला होता.त्यानंतर सैफ अली खानने 1993 मध्ये परंपरा या सिनेमातून पदार्पण केलं. हा एक मल्टीस्टारर सिनेमा होता. सैफ हा त्याच्या सिनेमांना घेऊन कधीच गंभीर नसायचा आणि तो सेटवर दारु वैगरे प्यायचा अशा अनेक अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. 


करीना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे. तर सैफ आणि अमृता सिंह यांमा सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.                                   






ही बातमी वाचा : 


IPL 2024 : 'कधी चांदणे टीपूर तुझ्या डोळ्यात वाचले...', सामन्याआधी रोहित-जयस्वालचे क्षण;पडली 'वादवळवाट' गाण्याची भुरळ