IPL 2024 MI vs RR : मालिका संपून काळ उलटला असला तरीही झी मराठी वाहिनीवर वादळवाट या मालिकेच्या शिर्षकगीताची जादू आजही कायम आहे. आजच्या दिवसाला देखील अनेकांच्या फोनमध्ये हे गाणं हमखास वाजतं. त्यातच इन्स्टाग्राम रीलवरही हे गाणं आवर्जुन पाहायला मिळतं. या गाण्याची आता आयपीएलमध्येही हवा पाहायला मिळतेय. राजस्थानच्या संघाला या गाण्याची भुरळ पडल्याचं पाहायला मिळतंय. राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याला हेa गाणं लावलं गेलं आहे.
सोमवार 22 एप्रिल रोजी आयपीएलच्या हंगामात राजस्थान विरुद्ध मुंबई सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या आधीचे काही क्षण राजस्थानच्या संघाकडून शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रोहित आणि यशस्वीचा देखील एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओ वादळवाट गाणं लावण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ बराच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय.
रोहित आणि यशस्वीचे क्षण
या व्हिडिओमध्ये यशस्वी जयस्वाल त्याची प्रॅक्टिस संपवून रोहित शर्मा जवळ जातो. त्यावेळी रोहित त्याला हात मिळवतो आण तो त्याच्या शेजारी बसतो. त्यानंतर ते दोघे गप्पा मारताना दिसतात. या क्षणाला वादळवाटच्या गाण्यातील थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले, कधी चांदणे टीपूर तुझ्या डोळ्यात वाचले, हे बोल आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
राजस्थानकडून मुंबईचा पराभव
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील 38 वी मॅच पार पडली. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 विकेटवर 179 धावा केल्या. मुंबईसाठी तिलक वर्मा आणि नेहाल वढेरानं चांगली फलंदाजी केली. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं चांगली सुरुवात केली होती. पावसामुळं बराच वेळ खेळ थांबवावा लागला होता. यशस्वी जयस्वालनं 31 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्यानंतर यशस्वी जयस्वालनं फलंदाजीचा गियर बदलला. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसननं शतकी भागिदारी केली. यशस्वी जयस्वालनं देखील महत्त्वाच्या मॅचमध्ये 59 बॉलमध्ये शतक झळकवलं. त्यानं 104 धावा करत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थाननं मुंबईला 9 विकेटनं पराभूत केलं.