ग्राउंड झीरो हा चित्रपट येत्या 25 एप्रिल ला प्रदर्शित होणार असून सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.ग्राउंड झिरो' हा चित्रपट 2001 मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. सोशल मीडिया वर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर व्हायरल होताना दिसतोय.
सई ग्राउंड झीरो मध्ये बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. ही फक्त एका बायकोची भूमिका असली तरी जवानाच्या बायकोचा त्याला असलेला खंबीर पाठिंबा यातून बघायला मिळणार आहे. सईने बॉलिवुड मध्ये आजवर अनेक सशक्त भूमिका साकारल्या आणि त्या तितक्याच ताकदीने साकारल्या.
यंदाच वर्ष सई साठी बॉलिवूडमय तर आहे पण मराठी आणि बॉलिवुड मध्ये सातत्यपूर्ण काम करणारी अभिनेत्री म्हणून सईची नवी ओळख संपादन झाली आहे. सई बॉलिवूड सोबत मराठीत देखील तितकच दमदार काम करताना दिसतेय.
येणाऱ्या काळात सई देवमाणूस चित्रपटात पहिल्यांदा लावणी वर थिरकताना दिसणार असून तिच्या चाहत्यांना ही एक पर्वणी आहे. सोबतीला गुलकंद, मटका किंग मध्ये सई दिसणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मनोज कुमार यांच्या शोकसभेत चाहत्याची 'ती' मागणी अन् जया बच्चन रागाने लालबुंद, हात पकडून म्हणाल्या...