Ayushmann Khurranas Wife : अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी आणि फिल्ममेकर ताहिरा कश्यप हिने 2018 मध्ये धाडसाने कॅन्सर सारख्या गंभीर आजवर मात केली होती. तेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. दरम्यान, ताहिराला सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झालाय. ताहिराने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी या कठीण काळात तिला सपोर्ट केला होता.
ताहिरा कश्यपची इन्स्टाग्राम पोस्ट
ताहिरा कश्यपने इन्स्टाग्राम पोस्ट करत लिहिलं की, सात वर्षांच्या नियमित तपासणीनंतरचा हा एक दृष्टीकोन आहे. ज्यांना दररोज मेमोग्राम करायचा आहे त्यांना मी हे सुचवू इच्छिते. माझ्यासाठी हा दुसरा राऊंड आहे... मला तो आजार पुन्हा एकदा झालाय.
ताहिरा खुरानाने कॅप्शन लिहिले की, 'जेव्हा जीवन तुम्हाला लिंबू देईल तेव्हा लिंबूपाणी बनवा. जेव्हा जीवन खूप उदार असते आणि ते तुमच्यावर पुन्हा फेकते. तेव्हा तुम्ही शांतपणे ते तुमच्या आवडत्या काला खट्टामध्ये मिसळू शकता आणि नंतर तुम्ही ते चांगल्या हेतूने ते प्या. कारण तुम्ही पुन्हा एकदा ताकदीने त्याच्याविरोधात लढणार आहात. नियमित तपासणी करा. मॅमोग्रामला घाबरू नका. स्तनाचा कर्करोग पुन्हा एकदा. आपण जमेल तेवढी स्वतःची काळजी घ्या.
ताहिरला 2018 मध्ये स्तनाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर ताहिराने याबद्दल जनजागृती केली आणि तिच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने बोलली. तिला ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणेही दिसून आली. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ताहिराने तिचे केस नसलेले फोटो शेअर केले होते आणि एक दमदार संदेश लिहिला होता. उपचारादरम्यानचे क्षणही त्यांनी शेअर केले.
ताहिरा कश्यपने पिन्नी और टॉफी या लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय 2024 मध्ये तिने शर्मा जी की बेटी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात दिव्या दत्ता, सयामी खेर यांसारख्या अभिनेत्री दिसल्या होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या