Jaya Bachchan Video: दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचं शुक्रवारी (दि.7) निधन झालं. त्यानंतरबॉलिवूडमधील कलाकारांनी रविवारी (दि.6) शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमीर खान, नील नितीन मुकेश, फरहान अख्तरसह बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन देखील उपस्थित होत्या.
यादरम्यान जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला जया बच्चन यांच्या खांद्यावर हात ठेवते आणि जया बच्चन रागावताना दिसत आहेत. जया बच्चन यांच्यासोबत फोटो काढण्याचा ती प्रयत्न करत आहे. यावेळी जया बच्चन रागाने लालबुंध झाल्या असून त्यांनी त्या महिलेचा हात झटकलाय. दरम्यान, या व्हिडीओमुळे जया बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत.
यूजर्स जया बच्चन यांन ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, त्या गैरवर्तन करत आहेत. तर एका वापरकर्त्याने लिहिले की, तुम्ही सेलिब्रिटी बनलेले आहात आणि तुम्हाला फक्त सार्वजनिक गोष्टींचीच ॲलर्जी आहे. एका यूजरने लिहिले - रेखा जी यापेक्षा चांगल्या आणि दयाळू आहेत. देव जे काही करतो ते चांगलेच असते, कधी कधी असे वाटते.
जया बच्चन अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात रागावताना दिसल्या आहेत. बच्चन यांना अनेकदा पापाराझींना फटकारताना पाहायला मिळालं आहे. एकदा जया या त्यांची नात नव्यासोबत असताना तिला पापाराझींचा राग आला. एकदा जेव्हा पापाराझींनी तिची सून ऐश्वर्याला ऐश म्हटले तेव्हाही त्यांना राग आला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या