Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने काही दिवसांपूर्वी लवकरच पाडव्याला एक गुडन्यूज देणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे सईने तिच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. तिच्या या आनंदाच्या बातमीने चाहत्यांना देखील आनंद झाला असून तिच्या या पोस्टवर अनेकजण अभिनंदनाचा वर्षावर करत आहेत. 


सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आतापर्यंत सईने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. ज्याप्रमाणे सई तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते, त्याचप्रमाणे सई ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. सईच्या या गूडन्यूजमुळे ती सध्या बरीच चर्चेत आलीये. 


काय आहे सईची गुडन्यूज?


अभिनेत्री सई ताम्हणकर हिने पाडव्याच्या मुहूर्तावर आलिशान गाडी खरेदी केली आहे.  अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे. यावेळी सईच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. लेकीचा आनंद पाहून सईची आई देखील भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. 






काहीच दिवसांपूर्वी सईने घेतलं नवं घर


दरम्यान सईने काहीच दिवसांपूर्वी तिच्या चाहत्यांना नवं घर घेऊन पहिली गुडन्यूज दिली होती. आता सईने आलिशान गाडी घेऊन पुन्हा तिच्या चाहत्यांना आता सुखद धक्का दिला. सईने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिच्या नव्या गाडीचा व्हिडिओ शेअर केलाय. यावर सईने दिलेल्या कॅप्शनची विशेष चर्चा होतेय. यावर सईनं म्हटलं की, 'तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही हे कोणालाही सांगू देऊ नका. स्वप्न पहा, ते साध्य करा, ते जगा! जसे आपण नवीन वर्ष सुरू करतो; चला नवीन ध्येये सेट करूया आणि ती एकत्रितपणे साध्य करूया !! पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.'






ओटीटीवर सईचा जलवा


'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई  'डब्बा कार्टेल' मध्ये सुद्धा दिसणार आहे. या  वर्षाच्या अखेर नेटफ्लिक्सवर 'डब्बा कार्टेल'ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या  सीरिजमध्ये शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. 






ही बातमी वाचा : 


आदित्यचं ब्रेकअप! अनेक दिवसांच्या अफेअरच्या चर्चांना अखेर पूर्णविराम?