मुंबई: “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार माझ्या हस्ते देणं हा माझाही सन्मान आहे...” अशा भावना केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केल्या. ज्या काळात कोणतेही इफेक्ट नव्हते त्या काळात बालगंधर्वांनी सगळ्यांवर मोहिनी घातली होती... ही बालगंधर्व नावाची मोहिनी पुढची अनेक दशके कायम राहील असा विश्वास देखील गजेंद्रसिंह शेखावत यांनी 25 व्या बालगंधर्व पुरस्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित २५ व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारांचं वितरण नुकतंच मुंबईत करण्यात आलं. २०२५ ला "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार" सोहळ्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. यंदा हा पुरस्कार सोहळा खूपच खास होता. अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. मुंबईतल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्यगृहात "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार" सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

Continues below advertisement

सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. गायन विभागात या पुरस्काराचे मानकरी ठरले कुमार सानू, पियुष पनवर.. कुमार सानू यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर केलेल्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली..सेवा रत्न पुरस्कारमध्ये सुहास दिवसे (जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे), एम.आय.डी.सी. चे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि महापारेषणच्या कार्यकारी संचालक सुचिता भिकाने यांनाही त्यांच्या प्रशासकीये सेवेतल्या योगदानासाठी सेवा रत्न पुरस्कारने गौरवण्यात आले. तर धर्मप्रचार आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.  "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार" दत्तात्रय माने यांच्या नेतृत्वाखाली साईदिशा प्रतिष्ठान गेल्या २४ वर्षांपासून काम करत आहे.. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या नावे "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार" विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो.. यावर्षी पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. 

ज्या काळात स्त्री नटी म्हणून नाटकात अभिनय करू शकत नव्हती अशावेळी बालगंधर्वांनी रंगमंचावर लक्षणीय स्त्री उभी केली. ए.आय. कितीही पुढारलं तर माणसाची जागा घेऊ शकणार नाही असं अभिनेते मकरंद देशपांडे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितलं. आपल्या घरच्यांची केलेला सन्मान खूप जास्त जवळचा असल्याचं म्हणत अभिनेत्री सई ताम्हनकर यांनी आयोजकांचे आभार मानले. तर भाऊ कदम यांनीही बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानतानाच साईदिशा प्रतिष्ठान आणि दत्तात्रय माने यांचाही विशेष उल्लेख केला.

Continues below advertisement

हेही वाचा

'बिग बॉस मराठी' फॅन्स ही लय भारी खबर ओळखलीत का? रितेश गेला हिंदी बिग बॉसच्या मंचावर; तारीख ठरली?