Sachin Tendulkar Relationship With Bollywood Actress: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि अफेअर्स... हे एक वेगळंच समीकरण. पण, त्याहीपेक्षा बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि क्रिकेटर्सच्या (Cricketers) जुळलेल्या गाठी नेहमीच चर्चेता विषय ठरल्यात. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या रंगलेल्या चर्चा काही नव्या नाहीत. यापूर्वीही आपण अनेक उदाहरणं ऐकली, पाहिली असतील... ज्यामध्ये अनेक अभिनेत्री आणि क्रिकेटर्सची नावं आपापसांत जोडली गेली आहेत. अशीच काहीशी चर्चा क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचीही रंगलेली. सचिन तेंडुलकरचं एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना एकेकाळी उधाण आलेलं. एवढंच नाहीतर सचिनची पत्नी अंजलीलाही सचिन डबल डेट करत असल्याच्या चर्चाही त्यावेळी सुरू झालेल्या.
सचिनसोबत ज्या बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं, ती दुसरी तिसरी कुणी नसून 90 च्या दशकात आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करणारी शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) होती. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शिल्पा शिरोडकरच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलेलं. काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये दिसून आलेली शिल्पा शिरोडकर आपल्या लव्ह अफेअरमुळे चर्चेत होती. अशातच तिचं नाव अचानक क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत जोडलं जाऊ लागलं.
शिल्पा शिरोडकरनं काही दिवसांपूर्वी रेड एफएमला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना सचिनसोबतच्या अफेअरच्या चर्चांबाबत भाष्य केलं होतं. त्यावेळी बोलताना शिल्पा म्हणाली होती की, ती 'हम' चित्रपटादरम्यान सचिन तेंडुलकरला भेटली होती. तसेच, तिनं सचिन तेंडुलकरसोबतच्या मैत्रीवरही भाष्य केलं आहे.
शिल्पा शिरोडकर सचिन तेंडुलकर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते?
शिल्पा शिरोडकर म्हणाली की, "मी 'हम' चित्रपट करत असताना मी पहिल्यांदा सचिन तेंडुलकरला भेटले. कारण माझा चुलत भाऊ सचिन जिथे राहत होता तिथे राहत होता. सचिन आणि माझा चुलत भाऊ वांद्रे पूर्वेला एकत्र क्रिकेट खेळायचे. अशी माझी आणि सचिनची पहिली भेट झालेली... म्हणून मी सचिनला अशा प्रकारे भेटले... आणि त्याचवेळी सचिन अंजलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण, त्यांच्याबद्दल फारसं कुणालाच ठाऊक नव्हतं. आम्हाला सर्वकाही माहीत होतं, कारण आम्ही मित्र होतो... एक अभिनेत्री क्रिकेटपटूला भेटते आणि तेसुद्धा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरला, म्हणून लोकांना चर्चा करायला आणखी सोपं झालं..."
त्याच वेळी, इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकरनं मुलाखत दिलेली. त्याचवेळी त्यानं शिल्पासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. सचिनला विचारण्यात आलेलं की, त्यानं आतापर्यंत स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मूर्खपणाची गोष्ट कोणती? त्यावर सचिन तेंडुलकरनं अजिबात कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत, तो म्हणाला की, "शिल्पा आणि माझ्या अफेअरच्या चर्चा... तेव्हा तर आम्ही दोघेही एकमेकांना चांगले ओळखतही नव्हतो..."
दरम्यान, दोघांनीही बोलताना रिलेशनशिपबाबत फक्त अफवा पसरवण्यात आलेल्या. आमच्यात फक्त मैत्री होती, असं म्हणत अफेअरच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. सचिन तेंडुलकरनं 24 मे 1995 रोजी अंजली तेंडुलकरशी लग्न केलं. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव सारा तेंडुलकर आणि मुलाचं नाव अर्जुन तेंडुलकर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :