Sadhana Singh on Sachin Pilgaonkar: आजच्या सिनेमांत अॅक्शन, हिंसा आणि गोंगाट असलेले वाढताना दिसत असले तरी कधीकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहता येतील असे साधे, भावनिक चित्रपटही बनायचे. 1982 साली प्रदर्शित झालेला ‘नदिया के पार’ हा अशाच काळाची आठवण करून देणारा चित्रपट. तब्बल 43 वर्षांनंतरही ‘गुंजा- चंदन’ ही जोडी प्रेक्षकांच्या मनात आजही तितकीच जिवंत आहे. या सिनेमातील गुंजाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री साधना सिंग यांनी अलीकडेच एका मुलाखतीत शूटिंगच्या दिवसांमधील काही न बोललेल्या गोष्टी उघड केल्या आहेत.
सचिनसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या...
अभिनेत्री साधना सिंग यांनी नदिया के पार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सचिन सोबत असलेल्या बॉण्ड विषयी सांगितलं. त्या म्हणाल्या," नदिया के पार फिल्म करण्यापूर्वी सचिन पिळगावकरांसोबत एकदा भेट झाली होती. मी तेव्हा मुंबई फिरायला आले होते. एक मैफिल होती. आम्ही गाणी वगैरे गायली. नंतर जेव्हा नदिया के पार च शूटिंग सुरू झालं तेव्हा सचिनला माहित नव्हतं हिरोईन कोण आहे. जेव्हा सचिनने निर्मातांना विचारलं की चित्रपटात हीरोइन कोण आहे तेव्हा त्यांनी माझा फोटो दाखवला. सचिनने लगेच ओळखलं. की ही साधना आहे. मी हिला खूप चांगलं ओळखतो. जेव्हा नदिया के पार चलो शूटिंग सुरू झालं तेव्हा मी सचिनसोबत खूप कम्फर्टेबल होते. एकमेकांची टांग खेचणं, मस्करी करणे हे तर सुरूच होतं. पण शूटिंग दरम्यान आम्ही यार झालो. आमच्यातील बॉण्ड बघून अनेक लोक आमच्यात अफेअर सुरू असल्याचे बोलत होते. पण नाही. पण जशी कुठल्याही दोन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये मैत्री असते तशीच निखळ मैत्री आमच्यात होती.
त्या पुढे सांगतात की, या अफवांमुळे आणि एका तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे ही मैत्री हळूहळू दुरावली. “आज भेट झाली तर आम्ही प्रेमानं बोलतो, पण पूर्वीसारखी जवळीक आता राहिलेली नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘नदिया के पार’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी
‘नदिया के पार’ हा चित्रपट कमी बजेट असूनही बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. अवघ्या 18 लाखांत तयार झालेल्या या सिनेमाने 5- 6 कोट्यवधींची कमाई करत बॉलिवूडला धक्का दिला. आजही या चित्रपटाला IMDb वर मिळालेलं रेटिंग या सिनेमाच्या लोकप्रियतेची साक्ष देतं. ‘कौन दिशा में लेके चला रे बटोहिया’ आणि ‘जोगी जी धीरे धीरे’ यांसारखी गाणी आजही लग्नसमारंभात आणि प्रवासात ऐकली जातात. याच कथेवर पुढे ‘हम आपके हैं कौन’सारखा सुपरहिट चित्रपट तयार झाला, हे विशेष. चार दशकांनंतरही ‘नदिया के पार’ आणि त्यातील कलाकारांची आठवण प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे, हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणावं लागेल.