Rupali Bhosale : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत संजना ही नकारत्मक भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने साकारली आहे. तिच्या या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेम दिलं. आता लवकरच आई कुठे काय करते ही मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण त्याआधी रुपालीने तिच्या चाहत्यांना मात्र एक गुडन्यूज दिली आहे. रुपालीने नुकतीच नवी आलिशान कार खरेदी केली केलीये. 


काही महिन्यांपूर्वीच रुपालीने मुंबईत तिच्या हक्काचं घर घेतलं होतं. त्यानंतर आता काही महिन्यांतच रुपालीने नवी कारही खरेदी केलीये. अनेक कलाकारांनीही रुपालीचं अभिनंदन केलंय. तसेच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावर केल्याचं पाहायला मिळतंय. 


रुपालीने शेअर केला खास व्हिडीओ


रुपालीने तिच्या कुटुंबासोबत तिच्या नव्या कारची खरेदी केली आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावरही शेअर केलाय. यावर कॅप्शन लिहित तिने म्हटलं की, वेलकम होम... रुपालीने दिवाळीच्या मुहूर्तावर तिच्या या नव्या कारची खरेदी केल्याचं पाहायला मिळतंय. 


रुपालीने खरेदी केलं हक्काचं घर 


काही महिन्यांपूर्वीच रुपालीने तिच्या बालपणीचं स्वप्न पूर्ण करत मुंबईत तिच्या हक्काचं घर घेतलं होतं. तिच्या घराच्या वास्तूशांतीला कलासृष्टीतल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर रुपालीने शेअर केले होते. त्यामुळे तिचं एक स्वप्न पूर्ण केल्यानंतर रुपालीने पुन्हा एकदा तिचं दुसरं स्वप्न पूर्ण करत रुपालीने नवी कार खरेदी केली आहे. 


हिंदी मालिकाविश्वात रुपाली


रुपालीने आतापर्यंत हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सोनी टिव्हीवरील सुमित राघवनसोबतची तिची बडी दूर सें आये हैं ही मालिका विशेष गाजली. या मालिकेतून ती हिंदी मालिकाविश्वातही सक्रिय झाली होती. तसेच अनेक मराठी मालिकांमधूनही रुपालीला पसंती मिळाली होती. पण आई कुठे काय करते या मालिकेमुळे रुपालीला विशेष पंसती मिळाली. दरम्यान रुपाली ही याआधी बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती.  






ही बातमी वाचा : 


Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा होस्ट बदलला? 'या' अभिनेत्याने सदस्यांची शाळा घेतल्याने चर्चांना उधाण