Rumored Couples Of South: तमन्ना भाटिया असो अथवा रश्मिका मंदाना यांच्यासह दाक्षिणात्या कलाकारांच्या अफेरर्सच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेकांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. नव्या वर्षाचं स्वागत करताना काही कलाकारांना एकत्र पाहिल्यानंतर या चर्चा रंगल्या आहेत.  पण अद्याप एकाही कलाकारानं नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. पाहूयात कोणत्या कलाकरांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.


तमन्ना भाटिया आणि विजय


नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तमन्ना भाटिया आणि विजय यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. याला कारणही तसेच आहे. कारण, गोव्यातील एका पार्टीमध्ये विजय आणि तमन्ना यांना स्पॉट करण्यात आलं होतं. यावर दोन्ही कलाकराकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. तमन्ना आणि विजय एकाच वेळी मुंबईवरुन गोव्याला पोहचले... विमानतळावर त्यांना स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर गोव्यात पार्टी करतानाही दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासून या कपल्सची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 



नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला






नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला एकमेंकाना डेट करत असल्याच्या चर्चा महिनाभरापासून सुरु आहेत. लंडनमध्ये दोघांना क्वालिटी टाईम स्पेंड करताना स्पॉट करण्यात आले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  नागा चैतन्य याचं लग्न सामंथासोबत झालं होतं, 2021 मध्ये त्यांचा घटस्पोट झाला होता...  नागा चैतन्य याने शोभिता हिच्यासोबतच्या अफेअरच्या बातम्यांचं खंडन केलेय. 



विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. नव्या वर्षामध्ये सेलिब्रेशनला दोघेही एकत्र असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोन्ही कलाकारांनी नव्या वर्षात टाकलेले फोटो पाहून चाहत्यांनी ते एकाच चागेवरील असल्याचा अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांनी लावलाय. पण डेटिंगच्या प्रश्नाला दोघांनीही मैत्रीचं नाव दिलेय. आता नव्या वर्षात पुन्हा एकदा दोन्ही कलाकराच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात. 



कल्याणी प्रियदर्शन - प्रणव मोहनलाल
कल्याणी प्रियदर्शन आणि प्रणव मोहनलाल या लहानपणीच्या मित्रांनाही चाहत्यांनीही अफेअरच्या चर्चेत जोडलेय. कल्याणीनं याचं खंडन केलेय. हृदयम या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शन - प्रणव मोहनलाल यांची केमिस्ट्री चाहत्यांना पसंतीस पडली होती.