RRR : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा आरआरआर (RRR) हा चित्रपट रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते. हा चित्रपट काल (26 मार्च) रिलीज झाला. चित्रपटाचा शो सुरू असताना काही लोक थिएटरमध्ये नाचत आहेत तर काही शिट्या टाळ्या वाजवत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी काही थिएटरच्या मालकांनी विशेष काळजी घेतली होती. थिएटरच्या मालकांनी आरआरआर रिलीज होण्याआधी चित्रपटगृहांमधील स्क्रिनसमोर खिळे ठोकण्याचा निर्णय घेतला. पण एका थिएटरमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये असणाऱ्या खिडक्यांच्या काचा फोडायला सुरूवात केली.
चित्रपटगृहामध्ये काय घडले?
सौमिथ यक्काटी यांनी एक व्हिडीओ शेअर करून या घटनेबद्दल माहिती दिली. काही तांत्रिक अडचणीमुळे विजयवाडामधील थिएटरमध्ये सुरू असलेला आरआरआर चित्रपटाचा शो बंद करण्यात आला. चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबवल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटगृहात तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
थिएटरच्या स्क्रिनसमोर खिळे
ANI च्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट शेअर करण्यात आले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी एका थिएटरचे फोटो शेअर केले. फोटोमध्ये वेंकटेश्वरलु अन्नपूर्णा थिएटरमध्ये स्क्रिन समोर खिळे ठोकण्यात आलेले दिसत होते. थिएटमधील कर्मचाऱ्यानं सांगितलं की, 'आम्ही स्क्रिन समोर खिळे ठोकले आहेत, कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक उत्साहित होतील आणि स्क्रिन समोरच्या पोडियमवर चढतील. त्यामुळे स्क्रिनला नुकसान होऊ शकते. '
RRR ची स्टार कास्ट
आलिया भट्ट , अजय देवगन , ज्युनियर एनटीआ आणि राम चरण या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.