SS Rajamouli Volvo XC40 : बाहुबली आणि RRR सारख्या ब्लॉकब्लास्टर चित्रपटाचे डायरेक्टर एसएस राजामौलीने (SS Rajamouli) नवीन कार खरेदी केली आहे. राजामौलीने Volvo XC40 कॉम्पैक्ट लग्जरी एसयूवी कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 44.50 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) इतकी आहे. Volvo Cars India ने आपल्या सोशल मीडियावर राजामौलीला गाडी देतानाचा फोटो पोस्ट केलाय.


Volvo XC40 या कारची तुलना बीएमडब्ल्यू एक्स 1 आणि ऑडी क्यू 3 यासारख्या एसयूवी कारसोबत केली जाते. राजामौलीची कार फ्यूजन रेड रंग आणि ब्लॅक रूफ असणारी आहे.  


इंजन आणि पावर
एसयूवीमध्ये 2.0-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजन देण्यात आलेय.  या कारचं इंजन 187 बीएचपी आणि 300 एनएमचा पीक टॉर्क देते. इंजन 8-स्पीड गियरबॉक्ससोबत येतेय. त्याशिवाय  कंपनी काही महिन्यानंतर  भारतात या एसयूवीला पूर्ण इलेक्ट्रिक व्हर्जन XC40 रिचार्ज सोबत आणणार आहे.  


फीचर्स
Volvo XC40 कारमध्ये अनेक फिचर्स देण्यात आली आहेत.  12.3-इंचाची व्हर्टिकल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिलेय. त्याशिवाय हारमन कार्डन 14-स्पीकर साउंड सिस्टम कारमध्ये आहे. यामध्ये पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, डुअल-झोन क्लाइमेट कंट्रोल मिळते. त्याशिवाय या कारमध्ये सात एअरबॅग,  डिस्टेंस अलर्ट, पार्क असिस्ट आणि रडार-आधारित सिटी सेफ्टी आणि स्टीअरिंग असिस्टसारखे फिचर्स देण्यात आलेय.  


दरम्यान, एस.एस राजामौली यांचा चित्रपट आरआरआर (RRR) बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर आरआरआरमध्ये मुख्य भूमिकेत दिसले आहेत आणि त्यांच्या जोडीने धमाका केला आहे. RRR रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला असून या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  


महत्वाच्या बातम्या :