RRR Box Office Collection : एस.एस राजामौली यांचा चित्रपट आरआरआर (RRR) बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर आरआरआरमध्ये मुख्य भूमिकेत दिसले आहेत आणि त्यांच्या जोडीने धमाका केला आहे. RRR रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला असून या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही RRR ची कमाई थांबत नाहीये. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी RRR च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे.
तरण आदर्शने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून RRR च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगितले आहे. 1000 कोटींच्या व्यवसायाचे पोस्टर शेअर करताना तरण आदर्शने लिहिले की, RRR ने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. एसएस राजामौली यांनी पुन्हा एकदा केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे वैभव परत आणले.
तरण आदर्शने पुढे लिहिले, राम चरण आणि जूनियर एनटीआर यांनी 1000 कोटी क्लबमध्ये पदार्पण केले आहे. तरण आदर्शच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने लिहिले - 'हा चित्रपट 2000 कोटींच्या क्लबमध्ये जाणार'.
RRR बद्दल बोलायचे तर, या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सोबत आलिया भट्ट आणि अजय देवगण महत्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, दोन स्वातंत्र्य सैनिकांची कथा यात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक 1000 कोटींचा व्यवसाय करण्याचा विक्रम केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- RRR Box Office Collection : आमिर खान अन् रजनीकांत यांच्या चित्रपटांना पछाडत आरआरआरची कोट्यवधींची कमाई; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
- RRR OTT Release Date : राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित
- RRR Box Office Collection Day 7:पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दिसली ‘आरआरआर’ची जादू, पाहा किती गल्ला जमवला?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha