RRR Box Office Collection : एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) ‘RRR’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 223 कोटींची कमाई केली होती. चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशातही कमाईच्या बाबतीत पुढे आहे. हिंदी व्हर्जनच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर चित्रपटाने 20.07 कोटींची कमाई केली होती.


त्याचवेळी, रिलीजच्या दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने हिंदी भाषेत सुमारे 23.75 कोटींचा व्यवसाय केला, ज्यामुळे त्याची दोन दिवसांची कमाई 43.82 कोटी झाली. आता तिसर्‍या दिवशी चित्रपटाला वीकेंडचा फायदा मिळाला आणि कमाईत वाढ झाली. असे मानले जाते की, रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने सुमारे 30 कोटींचा (हिंदी व्हर्जन) व्यवसाय केला, जो तिन्ही दिवसांमध्ये सर्वाधिक आहे. यानंतर, त्याची एकूण कमाई जवळपास 73 कोटींवर गेली आहे.



भारतात पहिल्या दिवशी 156 कोटींची कमाई!


‘RRR’ने पहिल्याच दिवशी भारतात 156 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाने आंध्र प्रदेशात 75 कोटी रुपये, निजाममध्ये 27.5 कोटी रुपये, कर्नाटकात 14.5 कोटी रुपये, तामिळनाडूमध्ये 10 कोटी रुपये, केरळमध्ये 4 कोटी रुपये आणि उत्तर भारतात 25 कोटी रुपये कमावले आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाने अमेरिका आणि कॅनडामध्ये 42 कोटी रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये 4.03 कोटी रुपये आणि न्यूझीलंडमध्ये 37.07 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. अशा परिस्थितीत ‘RRR’ने जगभरात 223 कोटींची कमाई केली आहे. ‘RRR’ने त्याच्या थिएटर राईट्समुळे तब्बल 470 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट नॉन-थिएटर कमाईतून 275 ते 300 कोटी कमवू शकतो.


काय आहे चित्रपटाची कथा?


‘RRR’ ही एक काल्पनिक कथा आहे, जी तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात राम चरणने (Ram Charan) ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि जूनियर एनटीआरने (Jr. NTR)) ‘कोमाराम भीम’ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याही भूमिका आहेत, या दोघांनीही तेलुगुमध्ये पदार्पण केले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha