RJ Mahavash : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal) याची कथित गर्लफ्रेंड आणि नुकतंच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या अभिनेत्री आर जे महावशला (RJ Mahavash) डेंग्यूची लागण झालीये. आर जे महावश सोशल मीडियावर सक्रिय असते. डेंग्यू झाल्याची माहिती आर जे महावशने इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवरुन दिलीये. इन्स्टाग्राम स्टोरीला तिने 'dengue ho gaya yar' असं लिहिलं असून त्याला डासाच्या आवाजाचं म्युजिक लावण्यात आलंय.
युजवेंद्र चहलचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. त्यानंतर युजवेंद्र चहल आणि आर जे महावश (RJ Mahavash) अनेकदा एकत्र स्पॉट झाले. तेव्हापासून चहल आणि महावशच्या (RJ Mahavash) अफेअर बाबत सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र, दोघांनीही या चर्चा नाकारले आहेत.
पहिल्याच वेब सिरीजमध्ये आर जे महावशने दिले बोल्ड सीन
आर जे महावशचे (RJ Mahavash) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 2.7 मिलीयन्स फॉलोवर्स आहेत. त्यातच युजवेंद्र चहलसोबत स्पॉट झाल्याने तिच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी आर जे महावशची वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. या सिरीजमध्ये महावशला महत्त्वाचा रोल मिळालाय. यामध्ये ती बोल्ड सीन देताना दिसली आहे.
'प्यार पैसा और प्रॉफिट' वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण
'प्यार पैसा और प्रॉफिट' या वेबसिरीजच्या माध्यमातून आर जे महावशने (RJ Mahavash) अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ही वेब सिरीज 7 मे 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईमवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. वेबसिरीजबद्दल माहिती देताना आर जे महावश म्हणाली होती की, अभिनेत्री म्हणून माझी ही पहिली वेब सिरीज आहे. हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. तुम्ही भरपूर प्रेम द्या... तुम्ही या वेब सिरीजला प्रेम नाही दिलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या