Ishaq Dar: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्यानंतरही दोन्ही देशांमधल्या तणाव थांबण्याचे नाव घेत नाही. शस्त्रसंधी झाल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. भारतीय सैन्याने सिंधू नदी करार रद्द केल्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,  युद्धबंदीबाबत करार झाला असला तरी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. जर सिंधू पाणी कराराचा (Indus Water Treaty) प्रश्न सोडवला गेला नाही तर युद्धबंदी धोक्यात येऊ शकते अशी धमकी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला दिली आहे.  (Operation Sindoor)

सिंधू पाणी कराराचा प्रश्न सोडवला नाही तर...

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अलीकडेच सीएनएनला मुलाखत दिली. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू पाणी कराराचा प्रश्न सोडवला गेला नाही तर युद्धबंदी धोक्यात येऊ शकते. हे प्रकरण जर सोडवले गेले नाही तर ती 'युद्ध कृती'च मानले जाईल. पाकिस्तानने आधीच पाणी कराराबाबत धमक्या दिल्या आहेत.

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला . यामुळे पाकिस्तानचे खूप नुकसान झाले. पाकिस्तानने स्वतः हे मान्य केले आहे. ते म्हणाले की, भारताच्या प्रत्युत्तरात त्यांचे 11 सैनिक ठार झाले आणि 70हून अधिक सैनिक जखमी झाले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदी अचानक आदमपूर एअरबेसवर पोहोचले.

सिंधू पाणी करारावरील स्थगिती कायम 

भारत पाकिस्तानसोबत कोणतीही जलविज्ञानविषयक माहिती शेअर करणार नाही आणि उत्तरेकडील तीन नद्यांवर जल पायाभूत सुविधा प्रकल्प पुढे नेईल. याव्यतिरिक्त, अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताला औपचारिकपणे स्वीकारले आहे. ज्या अंतर्गत भविष्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला युद्धाची कृती मानली जाईल.

हेही वाचा:

सीमा भागात तणाव असतानाच पाकिस्तानला कार्गो विमान पाठवलं का? चीन प्रतिक्रिया देताना म्हणाला...