Gold Price : सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात तब्बल 6500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहबे. 

सोन्याच्या दरात घसरण चांदीच्या दरात वाढ

सोन्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अलिकडच्या काळात त्याची किंमत गगनाला भिडल्यानंतर आता त्यात मोठी घसरण दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यानंतर, सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्स गोल्ड फ्युचर्सच्या किमती प्रति 10 ग्रॅम 92975 रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. 22 एप्रिल रोजी 99358 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचल्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. तर चांदीच्या किमतीत एक टक्क्याने वाढ झाली आहे. आज सकाळी 10 वाजता ती 943 रुपयांनी वाढून 96287 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. जून महिन्यातील सोन्याचा वायदा भाव 3.75 टक्क्यांनी घसरून 92901रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा जुलैचा वायदा 1.43 टक्क्यांनी घसरून 95343 रुपये प्रति किलो झाला आहे. इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते, सकाळी भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 93220 रुपये झाला. इंडियन बुलियनच्या मते, दिल्लीत सोने 92890 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे. तर मुंबईत तो 93050 रुपयांवर व्यवहार करत आहे. दरम्यान, सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं सर्वसाम्न्य सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांना एक प्रकराचा दिलासा मिळाला आहे. 

कोणत्या शहरात सोन्याचा काय दर?

सध्या मुंबईत सोने 93050 रुपयांना विकले जात आहे, तर बंगळुरुमध्ये ते 93120 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 93320 रुपये प्रति दहा ग्रॅम या सर्वोच्च दराने विकले जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एप्रिल महिन्यात एमसीएक्सवर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर पहिल्यांदाच 97000 रुपयांच्या पुढे गेला होता. अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारानंतर, आता पुढील 90 दिवसांसाठी बीजिंगमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क 145 टक्क्यांवरून 30 टक्के करण्यात आले आहे. तर, चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरील कर 125 टक्क्यांवरून 10 टक्के केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

India Pak War Gold Rate: भारत-पाकिस्तान युद्ध थांबताच सोन्याच्या भावात मोठी घसरण, भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव किती?