मुंबई : बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza)ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोघांमधील प्रेम त्यानंतर लग्न आणि आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. आपल्या दिलखुलास बोलण्यानं दोघेही चाहत्यांची मनं जिंकत असतात. ही फेव्हरेट जोडी दिवाळी पाडव्यानिमित्त एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात आली आहे. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. आज सायंकाळी चार वाजता हा कट्टा प्रसारित होणार आहे.
या कट्टयावर रितेशनं नवरा बायकोमध्ये भांडणं झाल्यानंतर तो कोणती ट्रिक वापरतो याबाबत सांगितलं आहे. भांडणं झाल्यावर तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारला असता रितेश म्हणाला की, माझ्या भांडणाची एक ट्रिक आहे. मी भांडण झालं की झोपून जातो. तर जिनिलिया म्हणाली की, रितेश भांडत नाही, मीच भांडते.
लग्नाच्या आधी जिनिलियाची काय होती अट? रितेश म्हणाला
लग्नाच्या आधी जिनिलियानं रितेशला एक अट घातली होती. एकदा तरी प्रपोज केलं पाहिजे अशी तिची अट होती, असं रितेशनं सांगितलं आहे. आज सायंकाळी 4 वाजता या कट्ट्याचा पहिला भाग प्रसारित होणार आहे. दिवाळीच्या सणाबद्दल विचारलं असता रितेशनं सांगितलं, लग्नानंतरची पहिली दिवाळी आम्ही लातूरलाच साजरी केली. आम्ही दहा वर्षात बहुतांशवेळा लातूरमध्येच दिवाळी साजरी केली. बाबा (विलासराव देशमुख) मंत्री झाल्यानंतर आम्ही मुंबईत आलो. ते मंत्री असताना देखील आम्ही बाभळगावातच दिवाळी साजरी करायचो. लहानपणीची दिवाळी भन्नाट असायची. आपल्याकडे प्रत्येक 100 किलोमीटरला परंपरा बदलतात. मुंबईतील दिवाळी आणि गावाकडची दिवाळी यात खूप फरक आहे, असं रितेशनं सांगितलं. आम्ही सगळे घरी बसून एकत्र दिवाळी साजरी करतो. आपल्याकडे प्रत्येक सणाच्या मागे एक कहाणी आहे, त्या गोष्टी एन्जॉय करायला हव्यात, असं रितेश म्हणाला.
रितेश आणि जिनिलियाच्या माझाच्या दिवाळी अंकाला शुभेच्छा
टेलिव्हिजन आणि डिजीटल विश्वात आजवर आम्ही तुम्हा प्रेक्षकांच्या साथीनं अनेक नवेप्रयोग केलेत. आपल्या आवडी निवडी जपत गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेती, मनोरंजन, क्रीडा थोडक्यातआपल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवले. आज या प्रवासाचा पुढचा टप्पा आम्ही सुरु करतोय माझाच्या पहिल्या दिवाळी अंकासोबत. या दरम्यान, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी माझाच्या दिवाळी अंकाला शुभेच्छा दिल्या आहेत. हा अंक वाचण्यासाठी आतूर असल्याचंही रितेश देशमुख यांनी म्हटलं आहे.