Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Cruise Drugs Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ऑफिसमध्ये हजेरी लावणार आहे. आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार, आर्यनला शुक्रवारी सकाळी 11 ते 2 दरम्यान, मुंबईतील एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी जामीनावर सुटका झाली होती.  


मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची 30 ऑक्टोबरला जामीनावर सुटका झाली. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आपल्या लेकाला घेण्यासाठी आला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत वकिलही उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर आर्यन खान आपल्या घरी मन्नतच्या दिशेनं रवाना झाला. दरम्यान, आर्यन खानला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयानं 14 अटी घातल्या आहेत. ज्यांचं पालन आर्यनला करावं लागणार आहे. जर अटींचं पालन आर्यननं केलं नाही तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो. 


... या 14 अटी 


1. आर्यन खानला एक लाख रुपयांचा पर्सनल बाँड भरावा लागणार आहे. 
2. अशाप्रकारच्या कोणत्याही प्रकरणात पुन्हा सहभागी न होण्याची हमी आर्यनला द्यावी लागणार 
3. या प्रकरणातील कोणत्याही आरोपींसोबत संपर्क साधायचा नाही. 
4. असं कोणतंही काम करु नये, ज्यामुळं त्यांच्यावरील आरोपांवर फरक पडेल. 
5. साक्षीदार किंवा पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करु नये
6. पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश
7. माध्यमांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यास मनाई 
8. उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई 
9. आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक
10. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार 
11. कोर्टाच्या प्रत्येक सुनावणी वेळी उपस्थित राहावं लागणार आणि तपासात पूर्ण सहकार्य करणं गरजेचं 
12. प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर चौकशीला विलंब करु नये 
13. अर्जदार/आरोपींना न्यायालयातील प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावं लागणार
14. आरोपीनं यापैकी कोणत्याही अटींचं उल्लंघन केलं तर मात्र जामीन रद्द करण्यासाठी एनसीबी विशेष कोर्टात अर्ज करु शकते  


Aryan Khan Released : वो 26 दिन! क्रूझ पार्टी ते सुटका; असे होते आर्यन खानचे 26 दिवस!


आर्यन खानला अटक झाल्यापासून संपूर्ण घटनाक्रम : 


आर्यन खान क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम
2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवरील कोर्डिलिया क्रुझवर धाड
3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुटटीकालीन न्यायालयाकडून ४ ऑक्टोबरपर्यंत पहिली कोठडी
4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी आर्यनला एनसीबी ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून आर्यनला न्यायालयीन कोठडी
आर्यन आर्थर रोड कारागृहात, कोरोनानियमावलीनुसार आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात
न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनकडून जामिनाची याचिका
8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीकडून आक्षेप
मुख्य महानगदंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळला
11 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात जामीनासाठी अर्ज
एनसीबीने उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
12 ऑक्टोबर काहीही कारवाई नाही
13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीकडून तीव्र विरोध
एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. एएसजी अनिल सिंह यांची न्यायालयात माहिती
14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण न्या. वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला.
15 ते 19 ऑक्टोबरपर्यंत सणासुदीच्यानित्ताने न्यायालय बंद.
आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला
20 ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
26 ऑक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.
27 ऑक्टोबरला आर्यन, अरबाज, मुनमुनचा युक्तिवाद पूर्ण.
28 ऑक्टोबरला न्यायमूर्ती सांबरे यांच्याकडून अखेर जामीन मंजूर.
29 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता हायकोर्टाकडनं निकालाची प्रत उपलब्ध
4:30 च्या सुमारास जुही चावला हमीदार म्हणून कोर्टात हजर
6:45 वाजता कोर्टाची प्रक्रिया पूर्ण, आर्यनची सीलबंद रीलिज ऑर्डर जारी
30 ऑक्टोबर पहाटे 5:30 वाजता रिलिज ऑर्डर आर्थर रोडच्या जामीन पेटीतून काढली
30 ऑक्टोबर : अखेर आर्यन खानची जामीनावर सुटका 


महत्त्वाच्या इतर बातम्या :