Share Market Updates: शेअर बाजारात आज सकारात्मक सुरुवात झाली.  प्री-ओपनिंगमध्ये  बाजाराची तेजीने सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजार वधारला असून सकारात्मक संकेत मिळत आहे.  


आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 369 अंकांनी वधारल्यानंतर 53793 अंकावर सुरू झाला. निफ्टीमध्ये 65 अंकांची किंचिंत तेजी दिसून आली. त्यानंतर 16078 वर ट्रेडिंग सुरुवात केली. आज बाजारात शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण झाली होती. त्यानंतर बाजार सावरला आणि वधारण्यास सुरुवात झाली. 


निफ्टीमधील 50 स्टॉक्सपैकी 15 स्टॉक्समध्ये घसरण दिसत आहे. तर, 35 शेअर्स वधारले आहेत. आज व्यवहार सुरू झाला तेव्हा सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये 15, 990 च्या अंकावर गेला होता. बँक निफ्टीमध्ये आज 33,106 च्या पातळीवर व्यवहार करत होता. आज सकाळी, 9.45 वाजण्याच्या सुमारास 492 अंकांनी सेन्सेक्स वधारला होता. तर, निफ्टी 128 अंकांनी वधारला होता. 


वधारणारे शेअर्स


आज, बँक निफ्टी, मेटल आणि खासगी बँकांचे क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील सर्व शेअर वधारले आहेत. मीडिया सेक्टरमधील शेअर्स 2.4 टक्क्यांनी वधारले आहेत. हेल्थकेअर इंडेक्समध्ये 1.42 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, आयटी क्षेत्रही 1.35 टक्क्यांनी तर फार्मा शेअर 1.30 
टक्क्यांनी वधारले आहेत. त्याशिवाय, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स आदी शेअरही वधारले आहेत. 


घसरणारे शेअर्स


एशियन पेंट्स 1.14 टक्के, कोटक महिंद्रा बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील 0.80 टक्क्यांनी घसरले. पॉवरग्रीड देखील 0.80 टक्क्यांनी घसरले आहे आणि श्री सिमेंट 0.73 टक्क्यांनी घसरत आहे.


दरम्यान, सोमवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 581.34 अंकांनी तर निफ्टीही 150.30 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.10 टक्क्यांची, तर निफ्टीमध्ये 0.95 टक्क्यांची वाढ झाली. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha