Rishab Shetty Fees For Kantara: Chapter 1: ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) सध्या त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांतारा चॅप्टर 1'च्या (Kantara: Chapter 1) प्रदर्शनाची तयारी करतोय. या चित्रपटात तो केवळ मुख्य भूमिकाच साकारणार नाही तर, या सिनेमाचं दिग्दर्शनही करतोय. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल फारच उत्सुक आहेत. अशातच, तुम्हाला माहितीय का ऋषभ शेट्टीनं या प्रोजेक्टसाठी किती पैसे घेतले?

Continues below advertisement


'कांतारा चॅप्टर 1'साठी ऋषभ शेट्टीनं किती मानधन घेतलं?


Siyasat.com च्या वृत्तानुसार, ऋषभ शेट्टीनं 'कांतारा चॅप्टर 1'साठी किंवा दिग्दर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतलेला नाही. त्याऐवजी, त्यानं नफा वाटून घेण्याचा पर्याय निवडला आहे. याचाच अर्थ असा की, ऋषभ शेट्टीची या चित्रपटातील कमाई पूर्णपणे त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर अवलंबून असेल. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, 'कांतारा चॅप्टर 1' 125 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलाय आणि ऋषभ शेट्टीनं या सिनेमात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.






'कांतारा चॅप्टर 1' हा सिनेमा कशावर आधारित?


'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील गोष्टी सांगणार आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वाचे शासक होते आणि त्यांनी या प्रदेशाच्या वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तो काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. 2023 मध्ये ऋषभ शेट्टीनं 'कांतारा' सिनेमाचा प्रीक्वल घेऊन येणार घोषणा केले, म्हणजेच प्रेक्षकांसाठी तो 'कांतारा 2' होता. अशातच 'कांतारा चॅप्टर 1' 2 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.  


'कांतारा चॅप्टर 1'मधील अभिनय आणि दिग्दर्शनाबद्दल ऋषभ शेट्टी काय म्हणाला? 


अलीकडेच झालेल्या त्यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान, ऋषभ शेट्टी यांनं 'कांतारा'मधील अभिनय आणि दिग्दर्शनाच्या दुहेरी आव्हानांबद्दल खुलासा केला. त्यानं आठवण करून दिली की, "काही अ‍ॅक्शन दृश्यांमध्ये मी अभिनय करत होतो आणि त्याच वेळी बॅकग्राऊंडला काहीतरी अडचणी येत होत्या." तो पुढे म्हणाला की, "मी लगेच मायक्रोफोन हातात घ्यायचो, वर जाऊन कलाकारांशी बोलायचो. त्यामुळे अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात लगेचच बदल व्हायचे. पण मी साकारत असलेली भूमिकाही अशीच आहे, म्हणून ते स्वाभाविक वाटायचं."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'छावा'मधल्या औरंगजेबानंतर अक्षय खन्ना आता 'असुरगुरु शुक्राचार्य'च्या रूपात; अंगावर शहारे आणणारा फर्स्ट लूक