Mahakali Movie Akshaye Khanna First Look: 2025 वर्षातला सर्वात पहिला हिट बॉलिवूड मूव्ही कोणता? असं विचारलं तर प्रत्येकाच्याच ओठी सर्वात आधी नाव येतं ते 'छावा'. या सिनेमात प्रत्येकाच्याच भूमिकेचं कौतुक झालं, पण त्यातल्या त्यात लक्ष वेधून घेणारी भूमिका ठरली ती, अक्षय खन्नानं साकारलेल्या औरंगजेबाची. त्याची चालण्याची पद्धत, बोलण्याची ढाप, ती करडी नजर प्रेक्षकांना थेट औरंगजेबाची आठवण करुन देणारी ठरली. अशातच आता 'छावा' सिनेमातल्या धमाकेदार भूमिकेनंतर आता अक्षय खन्ना नव्या भूमिकेत दिसणार आहे. या नव्या सिनेमातला अक्षय खन्नाचा लूकही रिलीज करण्यात आला आहे.
गाजलेल्या 'हनुमान' सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या नव्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. काल, प्रशांत वर्मा यांच्या टीमनं घोषणा केलेली की, ते काहीतरी नवीन घेऊन येत आहेत. आज, प्रशांत वर्मा यांनी त्यांचा आगामी चित्रपट, महाकालीची घोषणा केली आणि चित्रपटातील अक्षय खन्नाचा पहिला लूक (Mahakali Movie Asuraguru Shukracharya First Look Out) देखील रिलीज केला.
अक्षय खन्नाचा 'असुरगुरु शुक्राचार्य' या चित्रपटाचा पहिला लूक महाकाली चित्रपटातून प्रदर्शित - प्रशांत वर्मा यांनी आज त्यांचा नवा चित्रपट, महाकालीमध्ये असुरगुरु शुक्राचार्य म्हणून अक्षय खन्नाचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. जो भारतीय संस्कृतीतील सर्वात शक्तिशाली शक्तींपैकी एकावर आधारित आहे. चित्रपटाचं नाव 'महाकाली' असं आहे. प्रशांत वर्मा यांनी चित्रपटातील अक्षय खन्नाचा पहिला लूक प्रदर्शित केला. अक्षय खन्नानं चित्रपटात गुरू शुक्राचार्यांची भूमिका साकारली आहे. शुक्राचार्याच्या भूमिकेत त्यांना ओळखणं कठीण आहे. पांढऱ्या पोशाखात लांब, पांढरे केस आणि कपाळावर टिळा लावल्याचं दिसतंय. अक्षय खन्नाचा लूक खरोखरच अद्भुत करणारा आहे.
प्रशांत वर्मा यांनी आपल्या आगामी सिनेमा 'महाकाली'तील असुरगुरू शुक्राचार्य यांच्या भूमिकेतला अक्षय खन्नाचा लूक रिलीज केला आहे. लूक शेअर करताना कॅप्शन देण्यात आलंय की, "देवांच्या सावलीत, #महाकालीतून शाश्वत 'असुरगुरु शुक्राचार्य'च्या रूपात बंडाची सर्वात तीव्र ज्वाला उठली"
दरम्यान, प्रशांत वर्मा यांनी आजच 'महाकाली' चित्रपटातील असुरगुरु शुक्राचार्य म्हणून अक्षय खन्नाचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल किंवा चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.