Horoscope Today 30 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 1 ऑक्टोबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आज शारदीय नवरात्रीची नवमी तिथी आहे. हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये थोड्या कारणावरून वाद विवाद होतील, कर्ज फेडण्यासाठी वेगळे पर्याय शोधावे लागतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रकृतीच्या बाबतीत ज्येष्ठांनी दुर्लक्ष करून चालणार नाही, सरकारी कामे मार्गी लागतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात नवीन व्यवस्थापनावर भर द्याल, कामाचे गती वाढवण्यासाठी कामगारांच्या पोटात शिरून काम करून घ्यावे लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today
कर्क राशीच्या लोकांनो आज वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांचे सहकार्य आवश्यक ठरेल, आर्थिक प्रश्न सुटतील परंतु खर्चाचे योग्य नियोजन न केल्यास शिल्लक राहणार नाही
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज आपली धाव कुठपर्यंत आहे हे तुम्हाला पक्के ठाऊक आहे, त्यामुळे धाडस करताना मनाशी काही अडाखे निश्चित बांधल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज तुम्ही करीत असलेल्या कामाचे इतरांकडून कौतुक होईल त्यामुळे प्रतिष्ठाही लाभेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांच्या वागण्याचे गुढ तुम्हाला न उलगडल्यामुळे थोडे संभ्रमात पडाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज ताणतणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, आपली कुठे फसवणूक होत नाही ना याची दक्षता घ्या
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज राजकारणी व्यक्तींना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल, तब्येत सांभाळा
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज भावना इच्छा आणि कार्य यांचा खोल संघर्ष तुमच्या मनामध्ये सतत चालेल, त्यामुळे कृतीमध्ये एक विसंगती आढळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कोणती परिस्थिती आटोक्यात आणण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील
हेही वाचा :
October 2025 Lucky Zodiac: ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच 'या' 3 राशींना मोठा लकी ड्रॉ! तब्बल 5 ग्रह राशी बदलणार, नोकरीत पगारवाढ, पैशाची एंट्री...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)