Richa Chadha Ali Fazal Wedding : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फझल (Ali Fazal) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबत अनेक चर्चा होत होत्या. रिचा आणि अली यांचं लग्न कोणत्या पद्धतीने होणार याविषयी अनेक संदर्भ लावले जात होते. मात्र, आता या दोघांच्या बहुप्रतिक्षित लग्नाबाबत अपडेट समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे इकोफ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. 


रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच लग्नबंधनात अडकणारं हे जोडपं इको फ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. रिचा आणि अली यांचं पर्यावरणाविषयी असलेलं प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अनेक व्यासपीठांवर त्यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी भाष्य केलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी अशा अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.  


इकोफ्रेंडली पद्धतीने पार पडणार लग्नसोहळा :


थोडक्यात सांगायचे झाल्यास, इकोफ्रेंडली पद्धतीने म्हणजेच लग्नाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य हे पर्यावरण पूरक असणार आहे. यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा तसेच पुनर्वापर केलेल्या लाकडांचा वापर करून साध्या आणि पर्यावरणपूरक सजावटीचा प्रयत्न केला जाणार आहे. रिचा आणि अली त्यांच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासाडी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यासाठी काही एक्सपर्ट्सना बोलावले जाणार आहे. तसेच, लग्नसमारंभात होणारा प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देखील विविध उपाययोजना आखल्या जाणार आहेत. 


लग्नपत्रिकेचा फोटो होतोय व्हायरल :


बुधवारी (काल) या जोडप्यांच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या लग्नपत्रिकेच्या फोटोवर दोघेही सायकलवर आहेत. लग्नपत्रिकेची डिझाईन माचिसच्या डबीसारखी आहे. पॉप आर्ट पद्धतीनं तयार केलेलं दोघांचं चित्र माचिसच्या डबीवर आहे. माचिसच्या डबीचा लूक पूर्णपणे नव्वदच्या दशकातला आहे.  


रिचा आणि अली यांचा लग्नसमारंभ 4 ऑक्टोबरला मुंबईत पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाच्या विधीची सुरुवात 30 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :