Jayant Patil : शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) अस्थिर असून जनतेची नाराजी आहे. तर एकनाथ शिंदे अडचणीत आले असून चाळीस आमदारांना मंत्री पद हवे असल्याने शिंदे कोंडी झाली आहे. तर अनेकजण म्हणत आहेत कि, आम्ही परत आलो तर चालेल का? अशी शिंदे गटातील आमदारांची खदखद जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बोलून दाखवली.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू असून त्यातलाच एक भाग म्हणून आज नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणची बैठक आयोजित केली असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्यभर दौरे असून क्रियाशील कार्यकर्ते तयार करण्याचं काम सुरू आहे. एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरु असून राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) सर्व पक्ष एकत्र यावे, यासाठी प्रयत्न असून सर्व पक्षांचे म्हणणे एकच आहे. त्यामुळे जिथे शक्य होईल तिथे आघाडी करणार असून स्थानिक पातळीवर अधिकार जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले आहेत. त्यामुले स्थानिक घटक पक्षांशी समन्वय साधून एकत्र येण्यावर भर दिला जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यात भाजपने (BJP) जो बदल केला आहे, त्याची जनतेत नाराजी आहे. राष्ट्रवादीला संपविण्याचा डाव असून बारामतीच्या मागे हात धुवून लागले आहेत. पण बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा पराभव होणार नाही हे भाजपला ही माहिती आहे. मात्र तशी हवा तयार केली जातेय, प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. जोर लावण्याच काम भाजप नेहमीच करत आले आहेत. सध्या त्यांना भीती आहे कि 105 वरून ते 80 वर येतील. तसेच निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर म्हणाले कि, निर्मला सीताराम या बारामतीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मात्र तेथील जनतेला सीतारामन यांनाच प्रश्न विचारायचे आहेत. चप्पल, कपडे अन्नधान्यावर जीएसटी लावला. हा प्रश्न लोकांना विचारण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे निर्मला सीतारामन यांचा छुपा अजेंडा असून त्या बारामतीचा आदर्श विकास बघण्यासाठी आल्या आहेत. एकदोन भेटी देतील आणि नंतर विकास बघण्यासाठी हळूच जातील, असा चिमटाही यावेळी जयंत पाटील यांनी काढला.
तर वेदांत, फॉक्सकोन प्रकल्प महाराष्ट्र मधून गेला. ही सम्पूर्ण जबाबदारी शिंदे सरकारची आहे. आधीच्या उद्योग मंत्र्यांनी सवलती दिल्या होत्या. चर्चा केली होतो, हा प्रोजेक्ट तळेगावला होणार होता. यासाठी आम्ही प्रोजेक्ट खेचून आणला होता. मात्र प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अग्रवाल यांना भेटले का? इतर कुणाची भेट घेतली का? दिल्लीश्वरांची नाराजी होईल म्हणून अग्रवाल यांना भेटायला घाबरत आहेत.
शिवसेनेवर बोलण्यासारखे काही नसल्यानं शरद पवार आणि राष्ट्रवादी ला दोष देत आहेत. त्यामुळे अनेकांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भीती वाटते आहे. तसेच दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याच कारण नाही. शिंदे गटाला बीकेसी येथील जागेवर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी दिली आहे. त्यामुळे शिवतीर्थावर शिवसेनेला परवानगी नाकारण्याचे कारण नाही, पोलीस आणि मनपा कडे सबळ कारण नाही. परवानगी द्यायला पाहिजे. तर शिंदे फडणवीस सरकार अडीच वर्षात जी काम झाली, ती अडीच महिन्यात होणार, काहीही बोलायचे म्हणून बोलत आहेत, सद्सद्विवेक बुद्धीला पटत नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
आम्ही परत येतो....
शिंदे सरकारवर बरखास्त होण्याची टांगती तलवार आहे. 40 आमदारांच बरखास्त कधी ही सुप्रीम कोर्ट करू शकते. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग या व्यतिरिक्त काम करण्याची संधी मिळत नाही. तर दुसरीकडे शिंदे गटातील 40 आमदारांना मंत्री व्हायचे आहे. मात्र माझी सहानभूती शिंदे सोबत आहे. मुख्यमंत्र्यांना हे 40 जण किती त्रास देत असतील? तर तिकडे भाजपाचे उपमुख्यमंत्री झाल्याने 106 आमदार नाराज आहेत, अस्थिर सरकार असल्याचे प्रशासनाला कळाले, त्यामुळे अधिकारी ऐकत नाही. काही आमदार खाजगीत सांगतात कुठून अवदसा आठवली, या नादाला लागलो. सध्या सुरु असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अनेकजण म्हणतात, आम्ही परत आलो तर चालेल का?