Ratris Khel Chale Fame Actress Apurva Nemlekar : रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Actress Apurva Nemlekar) हिने आज (दि.25) मोठा खुलासा केलाय. रात्रीस खेळ चाले मधील शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर (Actress Apurva Nemlekar) हिने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तिचा यापूर्वी एक विवाह झाला होता. मात्र, काही महिन्यांतच तिचा घटस्फोट झाल होता. आता हीने "आम्ही असं ऐकलंय" या कार्यक्रमात जयंती वाघधरे यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने लग्न करण्याचा इरादा बोलून दाखवलाय. 

अपूर्वी नेमळेकर काय काय म्हणाली?

अपूर्वी नेमळेकर म्हणाली, खरंतर मी लग्न केलं होतं. आता घटस्फोट होऊन देखील 10 वर्ष झाली आहेत. आता मी त्यातून बाहेर पडलीये. काही गोष्टी स्वीकारायला वेळ लागला...काही विश्वातघात पचवायला वेळ लागला. आता मला काय नकोय आणि काय हवंय, याची क्लॅरिटी आलेली आहे. मी बराचसा वेळ घेतलाय. मला वाटतं आता मी लग्न करण्यासाठी तयार आहे. 

अपूर्वा नेमळेकर हिचा जन्म 27 डिसेंबर 1988 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे झाला. तिचं बालपण मुंबईच्या दादर भागात गेलं. तिचं शालेय शिक्षण किंग जॉर्ज शाळेत पूर्ण झालं, तर पुढील शिक्षण दादरमधील डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये झालं. तीने बीएमएस (बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज) ही पदवी प्राप्त केली आहे.

तिचा अभिनय प्रवास 2011 साली झी मराठीवरील 'आभास हा' या मालिकेपासून सुरू झाला. त्यानंतर तिने 'आराधना', 'तू जीवाला गुंतवावे', 'तुझं माझं जमतंय', 'प्रेम हे', 'तू माझा सांगाती' अशा विविध मालिकांमधून अभिनयाची चुणूक दाखवली. मात्र, तिच्या कारकीर्दीतला खरा टर्निंग पॉइंट ठरला तो 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेतील 'शेवंता' ही व्यक्तिरेखा. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली.

पहिलं लग्न कोणासोबत झालं होतं? 

अपूर्वा केवळ मालिकांपुरतीच मर्यादित नाही, तर तिने 'इश्क वाला लव्ह', 'भाकरखडी 7 किमी', 'रावरंभा', 'सब कुशल मंगल' यांसारख्या चित्रपटांमधूनही अभिनय केला आहे. 2022 मध्ये ती 'बिग बॉस मराठी 4' या रिअॅलिटी शोची उपविजेती ठरली. तसेच तिने 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या ऐतिहासिक मालिकेत 'राणी चेन्नम्मा'ची भूमिका साकारत ऐतिहासिक व्यक्तिरेखेलाही न्याय दिला. अपूर्वाच्या वैयक्तिक आयुष्यात काही चढ-उतार आले. 2014 मध्ये तिचं रोहन देशपांडे यांच्याशी लग्न झालं होतं, परंतु काही महिन्यांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. मात्र आता पुन्हा एकदा लग्न करायचं, असा खुलासाही तिने यावेळी केलाय. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरु होणार? भाऊ कदमच्या साथीला गौरव मोरेची एन्ट्री, श्रेया बुगडेने दिले मोठे संकेत