Somvati Amavasya 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 26 मे 2025 रोजी ज्येष्ठ अमावस्या (Somvati Amavasya) असणार आहे. अमावस्येच्या दिवशी तर्पण, पिंडदान केल्याने पितृ प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. त्याचबरोबर, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी राशीनुसार दान करणं फार शुभकारक ठरतं.
हिंदू धर्म मान्यतेनुसार, अमवास्येचा दिवस हा पितरांना समर्पित आहे. ज्येष्ठ अमावस्येला पितरांचा आशीर्वाद घेणं फार महत्त्वाचं असतं. या दिवशी पिंडदान आणि तर्पण केल्याने मोक्षप्राप्ती मिळते. तसेच, जर तुम्ही पिंडदान किंवा तर्पण करु शकत नसाल तर तुम्ही राशींनुसार काही वस्तू दान करु शकता.
मेष रास
मेष राशीने अमावस्येच्या दिवशी गरिबांना पाण्याने भरलेला माठ, सरबत सारख्या थंड पेयाचं दान करावं.
वृषभ रास
या राशीने गरजूंना धन आणि अन्नदान करावे. तसेच, भगवान शंकराला जलाभिषेक करावा.
मिथुन रास
या राशीच्या लोकांनी ऊसाचा रस दान करावा. तसेच, पितरांच्या निमित्ताने गरिबांना धन दान करा.
कर्क रास
या राशीने गरजूंना खाण्यासारख्या पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, साखर दान करावी.
सिंह रास
सिंह राशीने गूळ, चने आणि मध दान करावे. यामुळे पितृ प्रसन्न होतील.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुपात बनवलेले पदार्थ दान करावेत.
तूळ रास
तूळ राशीने ब्राह्मणांना भोजन द्यावे. तसेच, गरिबांना पांढरे पदार्थ, भात, तांदूळ, साखर, दूध दान करावे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पाणी, गूळ आणि लाल रंगाचे कपडे दान करावेत.
धनु रास
धनु राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी मिठाई, केळी आणि पिवळ्या रंगाचे कपडे दान करावेत.
मकर रास
पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या उडदाची डाळ, तीळ, तेल, काळ्या रंगाचे कपडे दान करावेत.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनी धन, चपला-बूटांचं दान करावं. यामुळे शनीची पिडा देखील दूर होईल.
मीन रास
मीन राशीने थंड पाणी, केळी, आंबे, बेसन किंवा बुंदीचा लाडू दान करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :