Alia Bhatt On Ranveer Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंना कमेंट करुन अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. काही नेटकऱ्यांनी तर रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले. अनेक सेलिब्रिटी रणवीरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया देत आहेत. आता रणवीरची मैत्रीण अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt) रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाली आलिया? 


आलियाचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डार्लिंग्सच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला आलियानं हजेरी लावली होती. त्यावेळी आलियाला रणवीरबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी आलियानं उत्तर दिलं,'मी माझ्या फेवरेट रणवीर सिंहबाबत काही निगेटिव्ह ऐकू शकत नाही. मला तर हा प्रश्न ऐकायचा पण नाहीये. रणवीरनं इंडस्ट्रीला बरंच काही दिलं. आपण त्याला फक्त प्रेम देऊया.' 




आलियाचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 'डार्लिंग्स' चित्रपटामध्ये आलियाच्या पतीची भूमिका अभिनेता विजय वर्मानं साकारली आहे. शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यू या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 


रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया 


रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राम गोपाल वर्मानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'जर मुली बॉडी फ्लॉन्ट करु शकतात तर मुलं का नाहीत? पुरुषांना वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये जज केलं जातं ही एक अतिशय दुहेरी मानसिकता आहे. महिलांना जेवढे अधिकार मिळतात तेवढेच पुरुषांना देखील तेवढाच अधिकार मिळाले पाहिजेत.' अशी प्रतिक्रिया राम गोपाल वर्मानं दिली.


हेही वाचा:  


Ranveer Singh photoshoot : 'मुली करु शकतात मग मुलं का नाही?'; रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया


IAA awards 2022 : 'आयएए' पुरस्कार सोहळा; रणवीर ठरला यंदाचा 'ब्रँड एंडॉर्सर ऑफ द इयर'