Ranjana Biopic : ‘परळ इच्छापूर्ती गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीच्या उत्सवासाठी रंजनाताई यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसोबत अशाच अनेक आठवणींना उजाळा मिळाला. 'रंजना अनफोल्ड' (Ranjana Unfold) या चित्रपटाच्या निर्मात्या आणि  कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संचालिका/डायरेक्टर वैशाली सरवणकर आणि लेखक,दिग्दर्शक अभिजित वारंग यांनी या मंडळाच्या गणपतीला नुकत्याच दिलेली भेट हे यामागचे निमित्त होते.


कार्निवल ग्रुपचे चेअरमन डॉ. श्रीकांत भासी प्रस्तुत 'रंजना - अनफोल्ड' या चित्रपटाची निर्मीती, कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संचालिका/डायरेक्टर वैशाली सरवणकर यांनी केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन करत आहेत. पुढील वर्षी 3 मार्च 2023 रोजी 'रंजना-अनफोल्ड' प्रदर्शित करण्याची योजना आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री रंजना देशमुख यांचा प्रवास उलगडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे.


रंजना ताई यांचा गणपती म्हणूनही प्रसिद्ध!


दरवर्षी परळच्या लाल मैदान गणेश चतुर्थीचा उत्सव जल्लोषात साजरा व्हायचा. रंजनताईंचा गणेश मंडळात उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा. त्यांच्या अपघात नंतर ही त्या तिथे व्हीलचेअरवर जाऊन बाप्पाचा आशीर्वाद आवर्जून घ्यायच्या.  त्याच बरोबर रंजनाताईंसोबत इतर कलाकारही या मंडळाला भेट देत होते. त्यामुळे परळ विभागात इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळख असलेला हा गणपती रंजना ताई यांचा गणपती म्हणूनही प्रसिद्ध झाला. म्हणून रंजना अनफोल्डच्या टीमने या ठिकाणी जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.  कार्निवल मोशन पिक्चर्सच्या ‘ठाकरे’ आणि ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या बायोपिकनंतर आता ‘रंजना : अनफोल्ड’ (Ranjana Unfold) हा बायोपिक बघण्यासाठी प्रेक्षक फारच आतुरतेने वाट बघत आहे.


'या' दिवशी होणार रिलीज!


'रंजना - अनफोल्ड' या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा प्रवास उलगडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून पुढल्या वर्षी 3 मार्च 2023 रोजी 'रंजना - अनफोल्ड' रसिकांसमोर सादर करण्याची योजना आखण्यात आली आहे.


मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी 1960 ते 2000पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. वयाच्या पाचव्या वर्षीच 'हरिश्चंद्र तारामती' या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी 'असला नवरा नको गं बाई' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर 'मुंबईचा फौजदार', 'सुशीला', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचुप गुपचुप', 'बहुरूपी', 'बिन कामाचा नवरा', 'खिचडी' अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. आता पुन्हा एकदा त्या बायोपीकच्या रूपात मराठी रसिकांसमोर येणार आहेत.


हेही वाचा : 


Entertainment News Live Updates 9 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!