CAT Trailer Released : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) CAT या वेब सीरिजद्वारे पुनरागमन करणार आहे. आज (शुक्रवारी) रणदीपच्या 'कॅट' या वेबसिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये रणदीप पंजाबमध्ये ड्रग्जच्या तस्करीत अडकलेल्या आपल्या भावाची सुटका करताना दिसत आहे. प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर 'कॅट' ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. 


रणदीप हुडाच्या 'कॅट' या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज 


रणदीप हुड्डा अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, रणदीपचं आता पुनरागमन झालं आहे. 'कॅट' या वेबसीरिजद्वारे तो चाहत्यांना दिसणार आहे. आज, OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर 'Cat' चा ट्रेलर रिलीज केला आहे. 1 मिनिट 40 सेकंदाचा CAT चा हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की रणदीप हुड्डाच्या या सीरिजमध्ये पंजाबच्या ड्रग स्मगलिंगची कथा दाखवण्यात आली आहे. रणदीप हुड्डाचा धाकटा भाऊ या अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकतो आणि पोलिसांच्या ताब्यात जातो. अशा परिस्थितीत पोलिसांचा अंडर स्पेशल कॉप 'कॅट' बनून रणदीप हुड्डा पंजाबमधील ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश कसा करतो, हे खरोखर पाहण्यासारखे आहे. सरदारच्या लूकमध्ये रणदीप हुड्डा खूपच हँडसम दिसत आहे. कॅट या सीरिजमध्ये रणदीप हुड्डा गुरनाम सिंगची भूमिका साकारत आहे. 


पाहा व्हिडीओ : 



रणदीप हुड्डाचा 'कॅट' कधी रिलीज होणार?


रणदीप हुड्डाच्या आगामी 'कॅट' या वेबसिरीजचा ट्रेलर समोर आल्यानंतर ही सीरिज पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. आता सर्वजण रणदीपच्या 'कॅट'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील महिन्यात 9 डिसेंबरपासून CAT वेब सिरीजचे ऑनलाईन स्ट्रीमिंग OTT प्लॅटफॉर्म Netflix वर केले जाणार असल्याची माहिती आहे. या सीरिजमध्ये रणदीप हुड्डा व्यतिरिक्त काव्या थापर (Kavya Thapar), दानिश सूद (Danish Sood), केपी सिंग (k.P. Singh) आणि गीता अग्रवाल (Geeta Agarwal) यांसारखे अनेक कलाकार आहेत.


रणदीप हुड्डाने आतापर्यंत अनेक दमदार, चांगल्या कथेचे सिनेमे दिले आहेत. आजवर त्याने हाय वे, रंग रसय्या, मर्डर, किक, बागी, सुलतान अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हाय वे या चित्रपटातील रणदीपची भूमिका प्रेक्षकांना जास्त भावली होती. 


महत्वाच्या बातम्या : 


India Lockdown : आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक, 'इंडिया लॉकडाउन'च्या माध्यमातून आईला वाहणार श्रद्धांजली