Rishi Kapoor : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे 30 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन(Sharmaji Namkeen) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी ऋषी कपूर यांना खास ट्रिब्यूट दिलं आहे.
ओम शांती ओम या ऋषी कपूर यांच्या हिट गाण्यावर अनेक कलाकारांनी डान्स करून त्यांना ट्रिब्यूट दिलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ अभिनेता फरहान अख्तरनं सोशल मीडियावर शेअर केला. गाण्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, आमिर खान, अर्जुन कपूर, विकी कौशल, आधार जैन, तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसत आहे. फरहान अख्तर हा शर्माजी नमकीन या चित्रपटाचा निर्माता आहे. आज (31 मार्च) हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर या चित्रपटाचे शूटिंग परेश रावल यांनी पूर्ण केलं. या चित्रपटामध्ये अभिनेत्री जुही चावलाने देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. शर्माजी नमकीन या चित्रपटामध्ये सोहेल नैय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा आणि ईशा तलवार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- RRR Box Office : राजामौलींच्या 'आरआरआर'ने पाच दिवसांत केला 100 कोटींचा टप्पा पार
- Star Pravah Pariwar Award 2022 : स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शकांचा होणार विशेष सन्मान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha